या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुध व दुभते. [प्रकरण wwwwwwxxxxxxxxxxxxxxxxxxxxwwwwwwwwwwwwwwwwwxnxx दूध मिळून त्यांचे आरोग्य व त्याबरोबर सर्व देशाची स्थिति सुधारण्यास मदत केल्याचे त्यांस श्रेय येईल, व हजारों गोरगरीब त्यांचे नांव काढून धन्यवाद गातील, ह्यांत बिलकुलं शंका नाही. इकडे श्रीमंत धार्मिकांचे लक्ष्य गेले पाहिजे.. गाई मशींची निवड. दूधघरे स्थापण्याचे ठरल्यावर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जागेची पसंती करून गुरांची निवड करणे व ती विकत घेणे ही आहे. जनावरांची निवड करणे हे काम फारच महत्वाचे आहे; कारण ह्या निवडीवरच दूधघरांपासून होणारे फायदे मुख्यत्वेकरून अवलंबून असतात. गुरांची निवड व खरेदी करतांना पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही कों, (१) गाई, मशी व पोळ ही दुभत्याविषयी प्रसिद्ध असलेल्या अवलादीची असली पाहिजेत. एखादी गाय किती जरी दिसण्यांत सुरेख असली व तिच्या रक्तांत जर कनिष्ट प्रकारची भेसळ असली, तर अशा गाईपासून दुधदुभत्याविषयी फायदा होणे कधीही शक्य नाही. अशा गाईची उत्पत्ति जरी जातवान अवजड कामें करणा-या भक्कम पोळापासून झाली असली, तरी त्यापासन पुष्कळ दूध उत्पन्न करण्याची पात्रता त्या गाईमध्ये कधीही येणार नाही. दुभत्या जनावरांची नस व अवजड कामें करणा-या जनावरांची नस ही एकमेकांपासून अगदी भिन्न आहे, किंवा अगदी परस्पर विरोधी आहे, असे म्हटल्यास काहीही हरकत नाही. ह्या करितां जनावरे विकत घेतांना त्यांचे पूर्वेतिहासाकडे लक्ष्य दिले पाहिजे. (२) याशिवाय विकत घेतलेल्या जनाबरांस आपल्या देशाचे हवापाणी मानवले पाहिजे. पंजाबांत गाई ८-९ शेर दूध वेळेला देतात; म्हणून तिकडून गाई महाराष्ट्रांत आणल्यास त्या फायदेशीर पडणार नाहीत. कारण त्या देशांची जमीन, हवा, पाणी वगैरेंत किती तरी अंतर आहे. थंड देशांतील अवलादीस उष्ण हवा कधीही मानवणार नाही. याकरितां ज्या देशांतील हवा पाणी आपले देशचे हवे पासून फारच भिन्न आहे, अशा देशच्या गाईम्हशी आपले देशांत आणल्यास त्यांचे दुधाचें मान पूर्वी इतकें कधीही राहणार नाही. ( 3 ) आपले देशाचा चारा-पाणीही भिन्न असतां कामा नये. लुसलुशीत चाऱ्यावर रहाणाऱ्या गाई मशीस जर कडव्यावर रहावे लागले, तर त्यांचे पोषण होणार कसे? आणि त्या भरपूर दूध देणार कशा ? (7) गाई खरेदी करतांना त्यांचे वयाकडेही नजर दिली पाहिजे. ८१० वर्षाच्या गाईपेक्षां ॥५ वर्षीच्या गाईपासून जास्त फायदा होईल. (५) तसेच गाई मशींचा स्वभाव, ही गोष्टसुद्धा फारच