या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें.] दुधाचे गुण- धर्म, (३) क्षारः-दुधांत खाली दिलेले सार असतात. [१] मीठ. [ २ ] पोट्याशियम्-क्लोराइड्-सायट्रेट, फास्फेट. [ ३ 7 मॅग्नेशियम्-सायट्रेटू-फॉस्फेट [ ] कॅलशियम्-सायट्रेट-फॉस्फेट. दुधाची उपयुक्तता. वर दिलेल्या तपशिलावरून दूध हा पदार्थ कितीतरी निरनिराळ्या गणधर्माच्या द्रव्यांचा झालेला आहे हे लक्षात येईल. त्यांतील ओशट पदार्थ व साखरेमुळेच पुष्कळ अंशी दूध रुचकर व स्वादिष्ट लागते व त्याचेच योगाने शरीरास लागणारी उष्णता आणि चैतन्य (Energy ) ही प्राण्यास मिळतात. नायट्रोजनयुक्त पदार्थाचे योगाने शरीरांतील स्नायूंची वाढ झपाट्याने होते व निरनिराळ्या क्षारांचे योगाने हाडांचा सांपळा तयार होतो. दुधाच्या उत्पत्तीची योजना लक्षात घेतां व नुकत्याच जन्माप्त आलेल्या प्राण्यास आपल्या शरीराची पूर्ण वाढ करण्यास अत्यावश्य लागणान्या पदार्थाची आवश्यकता लक्षांत पेतल्यास त्या जगन्नियंत्या परमेश्वराच्या रुतीचे कौतुकच वाटल्याशिवाय रहा. णार नाही. यावरून दुधास मृत्युलोकचे 'अमृत' का म्हणतात याची सत्यता चांगली पटते. लहानपणी आपल्या मातेच आणि पुढे गोमातेचे दूध जर मलीमलांस मिळाले नाही, तर त्यांच्यापासून पुढे निरोगी, बळकट काठीची आणि तरतरीत मेंदची भावी माता-पितर उपजावीत तरी कशी? याकडे प्रत्येक स्वयदेशहितचिंतकानें लक्ष द्यावे. असो.. निरोगी माणसास दूध जसें अमृत आहे, त्याच्या अगदी उलट रोगी माणमावर त्याचा परिणाम विषवत् होतो, याचेही कारण वरचेच आहे. कारण रोगी माणसाचे शरीरांत निरनिराळे सूक्ष्म रोगजंतु असतात व त्यांस दूध हे अमतच असल्यामळे त्यांची वाढ फारच झपाट्याने होते, रोग्याची पचनशक्ताही श्रीण झाली असते, त्यामुळे रोगाचा ज्यास्तच जोर होतो. अशावेळी दधाचा उपयोग फारच खबरदारीने करावा लागतो, हे प्रत्येकाने अवश्य लक्षात ठेवावें. -