या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. लावून ) मी सांगतों हे खोटे आहे का? पहा बरें विचार करून ! तुझ्यावरहि श्रीनृसिंहाची कृपा कांही कमी नाही. (तिचे चुंबन घेतो.) सुंद०-मी कुठे म्हणते आहे, माझ्यावर नृसिंहाची कृपा कमी आहे म्हणून ! आपली कृपा आहे हीच नृसिंहाची कृपा. ( हंसते.) महा०-(मनांत ) आतां गोष्ट काढायला बरी वेळ आहे. ( उधड) प्रिये, तूं आनंदांत येण्याचीच मी वाट पाहत होतो. आतां तुझ्यापाशी ती गोष्ट काढायला हरकत वाटत नाहीं; कारण तुझा स्त्रियांना दागिने हाणजे जिवा पेक्षा जास्त आवडतात. पण भावलाभावलीच्या अंगावरच्या दागिन्याच्या इतकेंच त्यांचे महत्व. पण मला नाही वाटत, तूं इतर स्त्रियां प्रमाणे हट्ट धरशील असें. तुला इतकें सांगितलें तें फुकटच कां गेलें असेल ? अग हा खेळ आहे. आपले दागिने कोणी उचलून नेले, ह्मणून कोणाला आपले नशिब तर नाही उचलून नेता यायचें ! सुंद-(रागानें) हो, पुरे झाल्या त्या नशिवाच्या गोष्टी! मला बाई फारच राग आला, आपण दागिन्यांचं नांव काढलं तेव्हां ! ही काय बाई बुद्धि आठवली आज ! आपल्या भोळे पणाच्या विचारण्याने, माझा रागच मेला कुठं नाहीसा होतो म्हणन ! नाहीं तर दुसरं कोणी असतं, तर त्याला सांगितलं असतं काय तें ! महा०-मग काय बरे वेड्या सारखें असें करावें! मी एरवी मागेन कां? तुझ्या अंगावर दागिने नसावेत म्हणून का हे केले ? आणि 'खरी शोभा दागिन्यांनी कां येते वेडे! हीच का तुझी समजत! लोकांनी आपल्या जवळ मागावें आणि आपण त्यांना द्यावे, हेच खरें भूषण, हाच खरा दागिना. मला तर हा मनापासून आवडतो, मग तुला कोणता आवडत असेल तो पहा ! संद-(मनांत ) म्हणणं कांहीं खोटं नाही इकडचं. आणि इकडच्या सहवासांत मला त्यांनी म्हटलेलाच दागिना आवडून घेतला पाहिजे. पण एकदम काढून देण्याला तयार होऊ नये. पन्हां मिळतील किं नाही याचं भय वाटतं ! पण मन दुखवण्याला सुद्धा