हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ११४ ]

नांवाच्या त्रैमासिक पुस्तकांत एक निबंध प्रसिद्ध केला आहे, त्यांत ते असें लिहितात कीं हें काम पूर्वेकडील आहे व पाश्चिमात्यांस असें काम कधींच करितां येत नव्हतें. ज्यावेळीं ताजमहालाचें काम झालें त्याच वेळीं तयार झालेल्या इटली देशांतील कामाची व त्याची तुलना करून पाहतां साहेब महाशूर यांची अशी खात्री झाली कीं ताजमहालाचें काम पाश्चिमात्याच्या हातून खचित झालेलें नाही. इटली देशांतील कामांत जीं फळांची व पक्ष्यांचीं चित्रें आहेत तीं त्या देशांतील भिंतीवर काढलेल्या जुनाट चित्रांवरून घेतलेलीं आहेत. त्यामुळें कलमानें काढावयाचें काम दगडांवर न साधून तें छिन्नभिन्न व विद्रूप झालें आहे. असल्या धेडगुजरी कारागिरांच्या हातून हिंदुस्थानांतील ताजमहालाचें अत्युकष्ट व मनोल्हादक आणि शिस्तवार कोंदणकाम खचित झालें नसावें, अशी त्यांची संपूर्ण खात्री होते.


प्रकरण ८ वें.
मणेरी काम.

 या देशांतील मणीकारांच्या कौशल्याची फार प्राचीन काळा पासून सर्व जगांत प्रसिद्धी आहे. हिंदुस्थानांतील भूस्तरविद्या * या नांवाचें एक मोठें पुस्तक मेहेरबान बॉल या नांवाच्या एका साहेबानें केलें आहे, त्यांत ते ह्मणतातः-- "हिंदुस्थानांत पैलू पाडून तयार झालेले स्फटिक व इतर रत्नें पृथ्वीच्या पृष्ट भागावरील सर्व प्रदेशांत अनंत कालापासून आज पर्यंत किती गेलीं असतील याची कोणाला देखील कल्पना करितां येणार नाही. प्रवाशी लोक युरोप खंडांतील वेगवेगळ्या बंदरीं उतरले ह्मणजे त्या गांवचे स्मरण रहावें ह्मणून तेथें उत्पन्न झालेले असें समजून विकणारावर भरवसा ठेवून ते खरेदी करितात ते स्फटिक, हिरे व ती रत्नें हिंदुस्थानाच्या खाणींतून निघालेली असतात इतकेंच नाहीं तर त्यांस पैलू सुद्धां हिंदुस्थानांतच पाडलेले


* खंबायत येथें अकीक सांपडतात व तेथे त्याचें पुष्कळ प्रकारचें सामान तयार होऊन भडोच बंदरीं विकावयास हल्लीं जातें त्याप्रमाणें पूर्वीही जात असेलच. त्या गोष्टीचा येथें संबंध आहे.