हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ५६ ]

सुन आहे तरी हल्लींच्या काळीं या धंद्याला तेज नाहीं. जयपूर, अलवार, दिल्ली व बनारस या गांवीं मिन्याचें काम सोन्यावर होतें. मुलतान, भावलपूर, काश्मीर, कांग्रा, कुल्लू, लाहोर, सिंधहैदराबाद, कराची, अबट्टाबाद, नूरपूर, लखनौ, कच्छ, आणि जयपूर या ठिकाणीं मिन्याचें काम चांदीवर होतें. काश्मीर आणि जयपूर येथें तांब्यावर हें करितात. या सर्व ठिकाणांत जयपूर येथें होत असलेल्या सोन्यावरील मिन्याच्या कामाची कोणत्याही देशांतील कारागिरांच्याने बरोबरी करवत नाहीं, इतकें तें सर्वोत्कृष्ट असतें. एक साहेब ह्मणतात:--" या सोन्यावरील मिन्यांतील रंग इंद्रधनुष्याची सुद्धां बरोबरी करण्यास समर्थ आहेत व ते जयपूर येथील कारागीर अशा रीतीनें वापरतात कीं, त्यांत सुधारणा करण्यास काहीं मार्गच रहात नाहीं, ह्मणजे त्यांत बेरंग मुळींच नसतो.

 जर्नल आफ इंडियन आर्टस् नांवाच्या त्रैमासिक पुस्तकांत जयपूरच्या मिन्याबद्दल खालीं लिहिलेला मजकर डाक्टर हेडले यांनीं छापला आहेः--
 " मिन्याचे काम दोन प्रकारचें आहे-एक ज्या दागिन्यांवर मिना जडवावयाचा आहे त्याजवर बायकांच्या डोक्यांतील दागिन्यांप्रमाणे घडींव नक्षी करून तिच्या पोकळींत रंगारंगाची पूड घालून तो भटींत जाळावयाचा. दुसऱ्या प्रकारांत तारेचें नक्षीदार काम करून तें सोन्याच्या तबकडीवर बसवून त्यांत रंगारंगाची पूड घालून जाळावयाचा. जयपुरास सोनार लोक प्रथम दागिना घडतात; नंतर तो घडई लोकांकडे जाऊन त्याजवर नक्षी घडून येते. ही नक्षी करण्याला लागणारीं पोलादी हत्यारें फारच साधीं असतात, परंतु त्यांनीं काम मात्र फार सुरेख होतें. पोलादाच्या हत्यारानें नक्षी केल्यावर अकिकाच्या खड्यानीं झील देतात, व अखेरीस नक्षीच्या खोचींतून पैलू पाडतात. या पैलूंमुळें रंग नीट चिकटतो इतकेंच नाहीं, तर त्यामुळें उजेडाची चमकही विशेष भासते. पैलू मारून दागिना तयार झाला ह्मणजे त्याजवर “ मीनाकार " आपल्या हातानें रंगारंगाची पूड टाकितो.त्यांत ज्या रंगास ज्यास्त आंच लागते, ती पहिल्यानें टाकतो. हे मिन्याचे रंग कांचेसारखे टिसूळ असतात व ते लाहोर येथून मणिहार नांवाने प्रसिद्ध असलेल्या मुसलमान लोकांकडून घ्यावे लागतात. खुद्द जयपूर येथील कारागिरांस हे रंग तयार करितां येत नाहींत. रंग कांचेवर चढविलेले असतात. व ते तयार करण्यांत मंडुरासारखी कांहीं भस्में (आक्झाइडस ) वापरण्यांत येतात. जयपूर संस्थानांतीलच खेत्री