हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६० ]

असले हलके दागिने जयपुरास पुष्कळ लोक तयार करतात. हे ओतींव असतात. मेणाचा व मातीचा सांचाकरून त्यांत सोन्याच्या हत्रीवजा वाक्याचा उत्तम नमुना जयपुरी सोनार पांच चार मिनिटांत तयार करितात. अगदीं प्राचीन काळचे दागिने रानटी लोकांत वापरतात. कारण त्यांच्यांत अजून सुधारणेचा प्रकाश पडून परदेशांतील नव्या नव्या जिनसा आपल्या घरांत भरण्याची स्फूर्ति झाली नाहीं. व त्यांजजवळ असलेले वडिलोपार्जित जुनाट दागिने विकण्यास काढले तर त्याजपासून कांहीं उत्पन्न व्हावयाचें नाहीं. त्यामुळें ते तसेच शिल्लक आहेत.

खोटे दागिने.

 सोन्या रुप्याच्या दागिन्यांसारखे खोटे दागिने जिकडे तिकडे हल्लीं होतात; व पूर्वीही होत असत. मृच्छकटिक नाटकांत अशा दागिन्यांबद्दल उल्लेख आहे. त्याजवरून पाहतां प्राचीन काळीं खोट्या दागिन्याचा अभाव होता असें नाहीं.

 पुण्यास खोटे दागिने अगदीं हुबेहुब खऱ्या सारखे होतात. व ते चांगल्या शोधक मनुष्याच्या हाती न गेले तर खरेच आहेत असे वाटण्याचा संभव आहे. मुंबईस कांही लबाड लोक असले खोटे दागिने खिशांत घालून रस्त्यांत फिरतात व कोणी बाहेर गांवचा गैर माहित मनुष्य दृष्टीस पडला की त्याच्या जाण्याच्या रस्त्यावर टाकून आपण बाजूस कोठे तरी उभे राहतात. हा नवखा आपल्यास सोन्याचा दागिना सांपडला आहे असे समजून तो उचलतो न उचलतो इतक्यांत वरील भामटा जवळ येऊन उभा राहतो. व मला त्यांतला भाग दे नाहीतर पोलिसांत वर्दी देईन अशी धमकी देतो. पाहुणा लालचीला लागून त्या भामट्यास आपल्या भागींत घेण्याचा यत्न करितो. पुढें दागिना विकावयाचा न विकावयाचा त्याची किंमत ठरवावयाची या गोष्टीचा मुख्य विचार करून अशी मसलत ठरते कीं दुकानांत किंवा सोनाराकडे जाण्यांत कांहीं अर्थ नाहीं. अपसांतच किंमत ठरवून एकानें दुसऱ्यांस अर्धी किंमत द्यावी ह्मणजे झालें. किंमत ठरविणें व त्या कामांत एकमेकास सहलत देणें या कृत्यांत भामटा तरबेत असतो. तो अखेरीस असें ठरवून आणितो कीं पाहुण्यानें त्यास अमुक रुपये द्यावे व त्यानें आपला हक्क सोडावा. या प्रमाणें रुपये हातांत पडले कीं लागलेच भामटे बुवा पोबारा करितात. पाहुणे घरीं येऊन मोठ्या आनंदाने आपल्या आप्तमित्रांस एकीकडे बोलावून साधलेली शिकार