१० ही प्रार्थना पापहरणकर्ता जो परमेश्वर त्यावां- चून दुसऱ्या कोणास उद्देशून असेल बरें ? त्याचप्रमाणे जेव्हां ते अर्से ह्मणतात-- 23:
- य. प्राणतो निर्मिषतो महित्वैक इद्राजा जगतो बभूव ।
यईशेस्य द्विपद चतुःष्पदः कस्मै देवाय हविषा विधेम ॥ जो तूं सर्व सेंद्रिय व निरींद्रिय जंतु- मात्रांवर आपल्या महिन्याच्या महिग्याच्या योगाने राज्य करीत आहेस, जो तूं आपली सत्ता सकल पशुपक्ष्यादि प्राण्यांवर नित्य चालवीत. आहेस त्या तुला सोडून आह्मी कोणाचें पूजन करावें ? असे ते जेव्हां ह्मणतात तेव्हां तो आपला स्रष्टा व प्राणदाता परमेश्वर त्या शिवाय कोणास उद्देशून बोलतात ? वेदकालापासून उपनिषदांच्या काली आपण आलों ह्मणजे आपणास फार निराळी स्थिति दृष्टीस पडते. त्यावेळी आर्यलोक या भरतखं- डांत येऊन बरीच वर्षे झाली असावीत. व त्यांनी आपला पगडा चांगला बसविला असल्याचें दिसतें. रानटी लोकांबरोबरचे कलह व लढाया नाहींशा होऊन जिकडे तिकडे शांतता झाली होती. ह्या शांततेत उपनिषत्कालीन ऋषि