या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ वाढल्यामुळे धर्मचर्चा करीत असतां परमात्मा व जीवात्मा ह्यांच्यामधील साक्षात् संबंधो काढण्यांत निमग्न होऊन गेले. जगामध्यें आप णांस दोन प्रकार दृष्टीस पडतात. एक आधि- भौतिक व दुसरा आध्यात्मिक. वैदिक ऋषि आधि- भौतिक जगांत ईश्वराचे स्वरूप पाहत. आकाशा मधील प्रकाशमान जो दिनमणि त्यास पाहून ते त्याची उपासना करीत. उपनिषदाच्या वेळीं ते बहिर्विषयांपासून निवृत्त होऊन अंतर्दृष्टीद्वा- रा परमात्म्याची आपल्या आत्म्यामध्यें उपल- ब्धि करून ब्रह्मानंदसुखाचा उपभोग घेऊं लागले. आह्मांला गाई दे, आह्मांला दूध दे, आमच्या शत्रूंचा संहार कर" इत्यादि प्रकारची त्यांची प्रार्थना नाही. त्यांची प्रार्थना "असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्यो- ममृतं गमय । आविरावर्मिएधि | रुद्रयत्ते दक्षिणं मुखं । तेन मांपाहि नित्यम्' 11 लणजे असत्यापासून मला सत्याप्रत ने, अज्ञान- रूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आम- च्यावर पाड, मृत्यूपासून आझाला सोडवून अमर्त्य कर; हे परमेश्वरा तूं माझ्या समीप ये आणि आप-