१२ ल्या सामर्थ्याने माझें संरक्षण कर, ह्या प्रकारची आहे. ते शांत, दांत होऊन आत्म्यामध्येच पर- मात्म्याचे दर्शन घेत. “शांतो दांत उपरत स्तितिक्षुः समाहितो भूत्वा आत्म- न्येव आत्मानं पश्यति । नैनं पाप्मा तरति सर्व पाप्मानं तरति । नैनं पाप्मातरति सर्व पाप्मानं तरति । विपापो विरजो विचिकित्सो ब्राह्मणो भवति" ॥ पाप ह्याचें आक्रमण करीत नाहीं. परंतु हाच पापास ओलांडून पार पडतो, पापापासून ह्याला त्रास होत नाहीं, हाच पापाचे दमन करितो, आणि पापापासून व सर्व दुर्विका- रांपासून मुक्त होऊन ब्रह्मज्ञ होतो. ब्रह्मप्राप्ती- पासून होणाऱ्या सुखाचें वर्णन खालीं लिहि- लेल्या श्लोकांत केले आहे. . “स मोदते मोदनीय हि लब्ध्वा तरति शोकं तरति पाप्मानं गुहा मंथिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति" ॥ आनंदस्वरूप में ब्रह्म त्या ब्रह्माच्या प्राप्तीच्या योगानें त्यास अत्यंत आनंद होतो. तो सर्व शोकापासून मुक्त होऊन पापाचा गंधही त्या- च्यामध्ये राहत नाहीं, आणि त्याचे हृदयांतील सर्व दुष्ट विकार नष्ट होऊन तो अमृतत्व पावतो. वैदिक ऋषि जसे बाह्यजगतामध्यें ईश्वरशक्ति
पान:धर्मवासना.pdf/१२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही