या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहून त्याची उपासना करीत त्याप्रमाणे उपनिष त्कालीन ऋषि आत्म्यामध्ये ब्रह्मदर्शन करून त्याविषयीं उपदेश करीत. आत्म्याचे ठायीं जें परमात्म्याचे दर्शन तेंच उत्कृष्ट दर्शन होय, व तेच ब्राह्मधर्माचें उपदेश्य तत्व आहे. बाह्य- सृष्टीत ईश्वरस्वरूप पाहणें हे दुरून बघण्या- सारखे आहे; परंतु अंतर्यामामध्येच त्याचा प्रकाश पडून दर्शन होणें ह्मणजे त्यास अगदी सन्निध पाहणे होय. भक्ताचा परमात्म्याशीं साक्षात् संबंध हेंच ब्राह्म ह्मणजे आर्यधर्माचें मुख्य तत्व होय. न्यायमूर्ति रानडे यांनी जे थोडे दिवसांपूर्वी व्याख्यान दिले त्यांतही त्यांनी हेच सांगितले आहे. " आर्यधर्माचें पहिलें व अत्यंत महत्वाचें लक्षण परमेश्वराचा व भक्ताचा सा- क्षात् संबंध. भक्त कितीही हीन, दीन, पतित, अज्ञान, कंगाल असो, त्याचें मन कळवळले अस लें व तो खरोखर दुःखी असला तर त्याचें देव प्रत्यक्ष संबोधन करितो; व ते आपल्या हातानें प्रेमानें स्वतः करितो; त्याला मध्यस्थाची गरज नाहीं; भट पुजारी कांहीं नको." मुसलमान लोक महंमदाला रसूल ह्मणजे ईश्वरप्रेरित