या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ह्मणतात. स्विस्ती लोक स्विस्तास ईश्वराचा अ वतार समजतात, आणि मुक्तिलाभासाठी त्याची मध्यस्थी अवश्य पाहिजे अर्से सांगतात. परंतु आमचें ह्मणणें तसे नाही. त्यांत आह्मी येवढेच तथ्य मानतों कीं हे महान् भगवद्भक्त सत्पुरुष जन्मास येऊन ईश्वरप्राप्तीचा योग्य मार्ग दाखविणारे होऊन गेले. ते फक्त मार्गप्रदर्शक. त्यांस फार झाले तर गुरुस्थानीं मानावें, त्यचिठाय ईश्वरत्व कांही नाहीं. अमात्यानें राजाच्या गादीवर बसणे जसें शोभणार नाही, तसे ईश्वराच्या स्थानीं गुरूला बसविणे योग्य होणार नाहीं. गुरु फक्त ईश्वरमार्गदर्शक, परंतु त्या मार्गास लागण्यास आपण स्वतः प्रय- त्न करून आपले विचार उन्नत केले पाहिजेत. अन्य धर्मात ह्यासंबंधानें कांहीं गोम असते.. देवतेच्या व उपासकाच्या मध्ये पडदे असतात. तसे ह्यांत (ब्राह्मधर्मात ) नाहीत; व " देवाची आणि भक्ताची प्रत्यक्ष सांगड असते; भक्त विव्हळ झाला, कासावीस झाला, ह्मणजे पुरे; मध्यस्थ अथवा विशेष पुरुष ह्यांची कृपा नलगे. "