१५ वैदिक ऋषि सृष्टीच्या बाह्यस्वरूपांत पर- मेश्वराचें रूप पाहत असत असे पूर्वी सांगि- तले. ह्याप्रमाणे सृष्ठीच्या महान् कार्या महान् शक्तींतच ईश्वराचे स्वरूप लक्ष्यांत आ णणे स्वाभाविक आहे, परंतु धर्माची जसजसी अवनति होऊं लागली तसतसी ह्या शक्तीच्या ठिकाणी किती निरनिराळ्या देवतांची व देवां- ची कल्पना प्रादुर्भूत झाली ? वेदांमध्यें ज्या देवतांचा उल्लेख आहे त्यांची गणना केली अ सतां एकंदर फक्त तेहतीस देवता आढळून येतात. परंतु आतां पौराणिक तांत्रिक मतानें त्याच्या तेहतीस कोटी देवदेवता झाल्या आहे त. वैदिककाळी देवतांच्या प्रतिमा अगर मूर्ति करीत नसत. ह्मणजे मूर्तिपूजा त्यावेळी होती असा दाखला मिळत नाहीं. उपनिषदामध्ये - 23 “न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महत यश: ह्मणजे त्याच्या नांवाचा यशादुंदुभि जिकडे तिकडे गाजत आहे, त्याची प्रतिमा नाही, असे ह्मटले आहे. आह्मी हल्लीं अशा परमेश्वराच्या मूर्ति आपल्या हातानें बनवून त्यांची पूजा क रितों. पृथ्वीच्या मातीनें स्वर्गलोक उभा करितों.
पान:धर्मवासना.pdf/१५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही