या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवलोक ह्मणजे मृत्युलोकाचें एक चित्र करून नेवितों. मनुष्याचे गुणावगुण व सुखदुःखे ईश्व- रावर आरोपित करितों. अशा प्रकारें मनुष्याचे स्थितीस लागणारी आवश्यक अशी सुखदुः खांची साधनें ईश्वरास आवश्य मानणे ह्मणजे त्या जगदीशास त्याचे उच्चस्थानापासून भ्रष्ट करणे होय, व ह्या योगानें आपल्याही आत्म्याची अवनति होत आहे. आमच्या मते अशापासून आपल्या देशाचें फार अकल्याण होत आहे. आपल्यास पूजनीय जी वस्तु तिची ज्या मानानें अवनति त्यामानानें आपल्या आत्म्याचाही अधःपात समजला पाहिजे. कांहीं लोकांचें असे ह्मणणे आहे की अप्र- तिम परमेश्वरोपासना साधारण लोकांमध्यें प्रचारित होणें शक्य नाहीं. त्यांच्या मतें मूर्ति- पूजा कनिष्ठ लोकांच्या उपयोगी आहे. जे लोक ब्रह्मज्ञानाचे अधिकारी नाहींत त्यांच्या- करितां साकार उपासना आहे ही गोष्ट खरी आहे असे आह्मांस वाटत नाही. आपल्या पाहण्यांत त्याच्या उलट मात्र स्थिति नजरेस येते. मुसलमान लोक सर्व अप्रतिम ईश्वराचीच