उपासना करितात. यहुदी लोक एका निराकार परमेश्वराची पूजा करतात. तर हिंदु लोकांमध्ये- च तशी निराकार देवतेची उपासना प्रसृत होणे कां शक्य नाहीं? आणखी एक गोष्ट अशी कीं, ईश्वराला पाहण्याकरितां काष्ठपाषा- णाच्या प्रतिमा करण्याची काय आवश्यकता आहे ? जें हें विश्वाचें विशाल सुंदर चित्र आ- पल्या समोर नित्य उमें आहे त्यांत ईश्वराचा प्रकाश आपणांस नाहीं का पाहतां येणार? यांत ईश्वराचें चातुर्य प्रतिबिंबित झाले असल्याचें आपल्यास दिसत नाही काय? व त्याची अगाध शक्ति आपणास ओळखतां येत नाहीं काय? तसेच त्याचे मंगलमय सुंदर स्वरूप ह्या सृष्टींत चिंबित झालेले आपल्या दृष्टोत्प तीस येत नाहीं काय ? हा दिनमाण सूर्य गग- नांत नित्य उदय पावून नियमितपणानें सर्व नगाला आपला प्रकाश व आपली उष्णता देतो. हा स्वच्छ चंद्रमा आपल्या चांदण्यानें सर्व जग धवलित करून टाकितो. हे सर्व ग्रह, नक्षत्र, तारे आकाशामध्ये तुटलेल्या मु- क्लासराप्रमाणे चमकत आहेत, ह्या पुष्पांनी
पान:धर्मवासना.pdf/१७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही