१८ प्रफुलित झालेल्या वृक्ष लता वेली, ही हिर- वीं गार शेतें, हे पर्वत, हे समुद्र, ह्या नद्या, हें जें सर्व आपण पाहतो त्यांत आपणांस ईश्वराचें साक्षात् दर्शन होत नाहीं काय ? तर मग आ- पण आपल्या हातानें काष्ठपाषाणाच्या मूर्ति बनवून त्यांत ते पाहण्याचा प्रयत्न कां करावा ? आपण पोरांप्रमाणे बाहुल्यांशीच खेळत बसावें काय ? अशा प्रकारच्या पूजेने आमचें समा- धान होणार नाहीं. आपणास पूज्य जो ईश्वर त्याची अशा रीतीनें सीमा करून परिमित भावानें त्यास भजणे योग्य नाही. ज्ञानी लोकांसाठी एक देवता व अडाण्यांसाठी दुसरी असें ह्मणण्यांत अर्थ नाहीं. भक्त अधि- कारी, ज्ञानवान्, उच्च जातीचा पाहिजे असे नाहीं. ईश्वरभजनाला मनुष्यमात्र अधिकारी आहे. सत्य हे सर्व मनुष्यांचें साधारण धन आहे. सत्याचा मार्ग राजमार्ग. सत्य ही फक्त कांही निवडक लोकांकरितां मंत्राप्रमाणे दिले- ली वस्तु नाहीं. तें सर्व जगजाहीर आहे. प्रत्येक मनुष्यानें सत्यप्राप्तीसाठी अंतःकरण- पूर्वक झटून आत्मोन्नति केली पाहिजे. सत्यास
पान:धर्मवासना.pdf/१८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही