१९ खाली ओढून आपल्या दर्जास आणतां येत नाहीं. आपणच उन्नत होऊन त्यास गांठण्याचा यत्न केला पाहिजे. सत्यास प्रिय वाटण्याकरितां असत्याचें रूप देतां कामा नये. कारण ज्ञा- न्यास तसे करण्याची जरूर नाहीं, व अडा- ण्यास तसे केल्यानें उलट अनिष्ट परिणाम मात्र होणार आहे. वैदिक धर्माची विशुद्धता नाहींशी होऊन त्याचे ठिकाणी जशी कनिष्ठ प्रतीची मूर्तिपूजा स्थापन झाली त्याप्रमाणे उपनिषद् धर्माचें खरें स्वरूप जाऊन त्याऐवजी अद्वैत व मायावाद उत्पन्न झाले. अद्वैत ह्मणजे जीव व परमात्मा ह्यांचा अभेदभाव; स्रष्टा आणि सृष्ट ह्यांचें मि- श्रण. ब्राह्मधर्माश है मत जुळत नाही. त्या धर्मात ह्या दोघांचा उपास्य व उपासक असा संबंध आहे. तो आमचा राजा व आह्मी त्याची प्रजा. तो आह्मांस पित्याप्रमाणे बोध करणारा, मातेप्रमाणे पालन करणारा, व मित्राप्रमाणे आह्मांस भेटण्यास सदा तत्पर असा आहे. नीवात्मा व परमात्मा ह्यांचा जरी एथग्भाव आहे, तरी हा भेद दूर होऊन जीव उन्नत होत्साता
पान:धर्मवासना.pdf/१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही