२० जसजसा परमात्म्याच्या सन्निध जाईल तसतसें त्याचें कल्याण होईल. कित्येक पंडित ह्मण- तात की उपनिषदांचा मुख्य उपदेश अद्वैतवाद आहे. परंतु हे खरे नाही. त्यांत अद्वैतवादा- सारखे कांही नाहीं असे आह्मी ह्मणत नाहीं, परंतु त्यांत अनेक ठिकाणी जीव व परमात्मा ह्यांची भेददर्शक वचनें आढळून येतात. ह्या- विषय एक दोन उदाहरणे दिली असतां बस आहे:- तमीश्वराणां परमं महेश्वरं, तं देवतानां परमं च दैवतं, पति पतीनां परमं परस्तात्, विदाम देवं भुवनेश मांड्यं ॥ अर्थ.-सर्व ईश्वरांमध्ये महान् व श्रेष्ठ, सर्व देवतांमध्ये आदिदैवत, नाथांचा नाथ, व सर्वांत श्रेष्ठ असा जो पूज्य जगदीश्वर त्याचे ज्ञान आह्मांस होवो. ह्या वचनांतील सर्वांत श्रेष्ठ परमेश्वर इत्यादि नीं विशेषणे आहेत ती फक्त परमात्म्यासच ला- गतात. ती जीवात्म्याला कधींही लागू पडणार नाहीत. आणखी एका ठिकाणी झटले आहे:- द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते । तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्ति अनश्नन्नन्यो अभिचाक- शीति ॥
पान:धर्मवासना.pdf/२०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही