२१ अर्थ-दोन पक्षी ज्यांच्या मध्ये नित्य स लोखा वास करितो असे जोडीनें एकाच वृक्षावर · राहतात, त्यांपैकी एक गोडगोड पिप्पलफलें खातो दुसरा कांहीं एक न खातां नुसता पाहत राहतो. ह्यांत जर द्वैतभाव नाहींतर द्वैतभाव म्हणावा तरी कशाला हे आम्हांस समजत 6 नाहीं. 'सखा' या शब्दानें दोन निरनिराळे पुरुष आहेत असे स्पष्ट दिसतें. एक फक्त भो- का व दुसरा फलदाता साक्षी पुरुष. आणखी एके ठिकाणी म्हटले आहे :--- - समाने वृक्षे पुरुषो निमग्नो । अनीशया शोचति मुल्य- मानः | जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशं महिमानमिति वीतशोकः॥ एका वृक्षावर वास करीत असतां पारतंत्र्या- मुळे मोह पावून पुरुष विव्हळ होतो. जेव्हां त्या पूज्य ईशास जाणून त्याचें गौरव ध्यानांत येते तेव्हां त्याचे मोह व शोक नाहीं से होतात. अद्वैतवादापेक्षां कनिष्ठ जो मायावाद त्या- ची उत्पत्ति पुढे झाली. हे सर्व जग असल्य मायामय आहे. जीव मायेच्या पाशानें बद्ध झाला आहे. रज्जु असतां जसा सापाचा भास
पान:धर्मवासना.pdf/२१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही