या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ होतो तसें अविद्येच्या योगानें हें जग असत्य मायामय असतां त्यास आपण सत्य ह्मणतों, हें मायावादाचें मुख्य वर्म आहे. ब्राह्मधर्मास हैं मत पसंत नाहीं. हें सर्व जग व संसार जर हें मायामय आहे तर मग आपल्या अस्तित्वाचें षं या जगांत वांचण्याचें काय फळ ? आमच्या जीवनाची सर्व कार्ये निष्फळ आहेत. ब्राह्मधर्माचें तत्व हे आहे की ईश्वरास अत्यंत प्रीति करणारा जाणून नित्य आपण आपले कर्तव्य करावें. संसार जर मायामय असेल तर आपण मग एवढी खटपट कशासाठी व कोणासाठी करावी, व ती करण्याचे प्रयोजन तरी काय? एके बाजूस मूर्तिपूजा व दुसरे बाजूस अद्वैत व मायावाद ह्या दोन्ही खडकांवर आपलें ब्राह्मधर्माचें तारूं थडकूं न देतां मधोमध सरळ चालविलें पाहिजे. आपल्या सनातन आर्यधर्मरूपी सुवणीत जें पुष्कळ हीण मिसळले आहे त्यांतून त्याचें शुद्ध स्वरूप निव- डून काढणें हाच ब्राह्मधर्माचा मुख्य उ देश होय. एथवर जे निदर्शन केले त्यावरून असे. दिसून येईल की आपल्या देशांत ब्राह्मधर्म