या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
धर्मवासना. मनुष्याच्या मनामध्ये धर्मसंबंधी काहींना कांही तरी गूढ प्रश्न सर्वकाळ उत्पन्न होत असतात. फार प्राचीन कालापासून मानवी प्राणी आपल्या शरीराच्या पोषणाकरितां उद्योग करीत आले आहेत; तहत् आत्म्याच्या उन्न- तीकरितांही धर्माच्या बाबतींत विवेचन करीत आले आहेत. अशा प्रकारें जग, मुक्ति, पर- लोक, जीवन, मृत्यु, सृष्टि इत्यादिकांविषयों मनुष्याच्या मनांत विचार घोळत असणे अत्यं त साहजिक आहे. सृष्टीच्या आरंभापासून आज लाखों वर्षे होऊन गेलीं तरी ह्या सृष्टी- संबंधों गूढ कोड्याचा अद्याप कोणासही उल गडा करितां आला नाहीं. मी कोठून आलों, ह्या ब्रह्मांडाचें आदिकारण काय, ज्याच्या योगानें हा सृष्टिक्रम एकसारखा चालत आहे. ती चालकशक्ति कोणी दिली, सजीव प्राण्यांस जीवन कोणापासून प्राप्त होते, मनुष्याच्या आत्म्याच्या ठाई बुद्धि व ज्ञान ह्यांचें बीजारो-