पण कोणी केले हे सर्व सृष्टिसंबंधी मोठे गूढ आहे. जो तो यथाशक्ति व यथामति ह्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु हे त्यांचे करणे जसा एखादा पक्षी उड्डाण करून सूर्याजवळ पोहोचण्याचा यत्न करितो पण व्यर्थ तद्वत् होय. आपण आपल्या देशाच्या स्थितीकडे पा- हतां असे दिसून येतें कीं फार प्राचीनकाळा- पासून धर्मसंबंधी प्रश्नांची चर्चा आपले लोक- करीत आले आहेत. तीन हजार वर्षांपूर्वीचे जे ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांवरून वैदिकका लचे ऋषि ह्या विषयाचें पर्यालोचन करीत असल्याचे आढळून येतें. त्यांच्या दृष्टीला हो पृथ्वी किती नवीन व आश्चर्यकारक भासत होती ह्याची आपणास कल्पना मुद्धां करितां येत नाहीं. हल्लीं ज्या आदिभी- तिक शक्तीचे आपणांस कांहींच नवल वाटत नाहीं त्या त्या वेळच्या मनुष्याच्या बाल्या- वस्थेत त्या वैदिक महर्षीच्या सद्यः संकृत झा- लेल्या दृष्टीला फार अचाट आणि केवळ गा- रुडापमाणे दिसत होत्या. जेथे आपण वास -
पान:धर्मवासना.pdf/४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही