करीत आहों तो हा भूलोक व आपल्यावरती. जें ग्रह ताऱ्यांनी भरलेलें आकाश तो द्यूलोक ह्या ऋषींना अतिशयित अद्भुत वाटत असे. ही रमणीय सुंदरी उषा जी प्राणिमात्रांनां जागें करून आपल्या कामाला प्रवृत्त करिते त्या उपेला ते देवता मानून मोठ्या उत्साहाने तिची प्रार्थना करीत असत. ही शुभ्रवसना उपा जी निद्रेत गुंग असल्यामुळे आपल्या ध्यानीं मनीं सुद्धां येत नाहीं ती त्यांच्या नजरेला किती अमृतमय, किती सुंदर, किती गोड, भासत असे ? त्याप्रमाणे हा सूर्य जो उदय पावून आपली उज्वल किरणें चोहोंकडे फेंकून सर्वांस प्रकाश व प्राण देतो त्या सूर्याचा महिमा त्यांस किती अनिर्वचनीय वाटत होता हैं सूर्यास ते सविता ह्मणजे उत्पन्न करणारा असे ह्मणत ह्यावरून दिसून येईल. जसा हा गग- नप्रदीप रवि तसाच आपल्या पृथ्वीवरील अ- ग्रिही त्यांचें पूज्य दैवत होतें. वेदांत अग्रीस यविष्ठ व कनिष्ठ देवता असे झटले आहे. अग्रीची तितकी योग्यता आतां आपणास वाटत नाहीं. हल्लीं तो फक्त ह्या संसारांत मनु- .
पान:धर्मवासना.pdf/५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही