प्याच्या उदरनिर्वाहास साधनीभूत जे पदार्थ आहेत त्यांपैकी एक आहे असे आपण सम- जतों; परंतु विचार करा की जेव्हां हा अमि दुर्मीळ होता व ज्यावेळेस लांकडावर लाकूड किंवा पाषाणावर पाषाण घांसल्यापासून तो निर्माण होऊन आपल्या शेंकडों ज्वाला प्रकट करी त्यावेळेस त्या वैदिक ऋषींच्या दृष्टीस तो किती आश्चर्यकारक व आनंददायक दिसत असे ? ह्मणून तेव्हां ते मोठ्या प्रेमानें त्याचा स्तव करीत. अग्निमीडे पुरोहित यज्ञस्य देवं ऋत्विजं होतारं रत्न- धातमम् । ज्याप्रमाणें ह्मणजे जो अमि पुरोहित, होता, यज्ञाची देवता, ऋत्विज आणि रत्नाप्रमाणे उज्वल असा त्या अग्नीचे मी स्तवन करितों. सूर्य व अग्नि त्याप्रमाणे आकाशांतील द्युपिता हाही वेदकाळी एक दैवत मानीत असत. आकाशांत दोन प्रकार आपण पाहतों. कधी कधीं ते अगदी स्वच्छ नीळवर्ण असून त्यांत तारे चमकत असल्याचे आपण पाहात. कधी कधीं ते अभ्राच्छादित होऊन मळीण झालेले आ-
पान:धर्मवासना.pdf/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही