या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पल्या दृष्टीस पडतें. ज्यावेळी आकाशा- ची पहिली स्थिति पाहण्यांत येत असे त्यावेळी वैदिक ऋषि ह्यास द्यौ असें ह्मणत. जेव्हां उन्हाळा संपून आकाशांत ढग येऊं लागत आणि नुक्ताच पाऊस पडून वाळलेले गवत हिरवेंगार होई, आणि चहूंकडे जमिनी पिकांनी सुशोभित होत, तेव्हा हे सर्व इंद्रदेवतेच्या प्रसादाचें फळ आहे असे ते समजत असत, व अशा अभ्राच्छादित आकाशास ते इंद्रदे- वता मानीत. ज्या समयीं अनावृष्टीमुळे दु- प्काळ पडून चहूंकडे हाहाकार होई त्या समयी ही इंद्रदेवता वृत्रासुराचा वध करून मरुद्गणां- च्या साह्यानें दुर्भिक्षरूप राक्षसापासून त्यालोकांस सोडवी व ते तिची स्तुति करीत. ●देशाची उपजीविका मुख्यत्वेंकरून शेतकीवर अवलंबून आहे ही गोष्ट मनांत आणली ह्म- णजे इंद्रदेवतेस वैदिक देवतांमध्ये ते इतकें म हत्व कां देत ह्याचे कारण सहज लक्षांत ये- ण्याजोगे आहे. ज्याप्रमाणे ही सृष्टिशक्तीची पूजा वेदांत दिसून येते त्याप्रमाणेच ह्या प्रकृ तीच्या द्वारे तत्कर्ता जो कोणी त्याचा कडेही आपल्या -