पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लायसेंकोने नेमके काय केले? गव्हाच्या बऱ्याच जातींची वसंतऋतूत चांगली उगवण होण्याकरता ते बी थंडीच्या कडाक्यातून जावे लागते.त्याऐवजी ते आधी उबदार पाण्यात ठेवून त्याला मोड फुटायला लागल्यावर गार करायचे. बर्फात ठेवायचे.असे बी, बर्फ वितळून जमीन मोकळी झाल्याबरोबर पेरता येते.रोपांना वाढायला जास्त काळ मिळतो ( किंवा कमी काळ पुरतो ) आणि पुढच्या थंडीचा फटका बसण्याच्या आत धान्य तयार होऊन पीक हातात पडण्याची शक्यता वाढते.रशियात उत्तरेला जावे,तसतसा पहिली थंडी संपून दुसरी सुरू होण्यापर्यंतचा काळ कमी होत जातो.तेवढ्या थोड्या काळात तयार होणारा हळवा गहू असेल, तर उत्तरेकडच्या प्रचंड भूभागावर त्याचे उत्पादन करता येईल.एरवी परिपक्क होण्याकरता जास्त काळ घेणारा गहू, त्याचे असे कान टोचले की हळवा होतो नि पिढ्यान् पिढ्या आपल्याला हवे तसे वागतो,असे निदान लायसेंकोचे म्हणणे.या प्रक्रियेला त्याने नाव दिले व्हर्नलायझेशन.लायसैकोचा प्रचंड उदोउदो झाला.त्याच्याकडे जणू रशियन शेतीचा त्राता अशा नजरेने लोक पाहू लागले.पण हे बऱ्याच अंशी कागदोपत्री होते.प्रत्यक्षात कसली जाणारी जमीन फारशी वाढत नव्हती.कान टोचलेला गहूसुद्धा फारसा कामी येत नव्हता.गंमत म्हणजे दुसन्या महायुद्धाच्या वेळी लायसैको कर्तुमकर्तुम्झा ल्यानंतर, त्याचे देव्हारे माजवले जात असतानाच व्हर्नलायझेशनवरची चर्चा थांबली होती.

 कड़ाक्याच्या थंडीचे आणि तोकड्या हंगामाचे प्रश्न फक्त रशियातच नाहीत.अमेरिका आणि कॅनडामधेही आहेत.इथल्या वैज्ञानिकांना आणि शेतकऱ्यांना अशा प्रक्रियेची माहिती होती, पण ती अनुभवाअंती फारशी उपयुक्त पद्धत न बाटल्याने मागे पडली होती, तज्ञांच्या मते लायसेंकोला जे काही यर्यादित यश मिळाले त्याचे रहस्य व्हर्नलायझेशन किंवा कान टोचण्यामधे नसून कृत्रिम सिलेक्शनमधे आहे.लायसेंको ज्या जाती वापरत होता, त्या शुद्ध नसून अनेक जातींचे मिश्रण होते.त्याच्या प्रक्रियांमुळे गैरलागू बी मरून जात असे आणि सोयीस्कर गुणधर्म असलेले बी शिल्लक राहत असे. जर शुद्धात ( दूब्रीडिंग ) असेल, तर तिच्यावर अशा सिलेक्शनचा परिणाम होणार नाही. त्याचा मुख्य दावा म्हणजे संस्कारातून हवे तसे गुणबदल घडवून आणणे किंवा गव्हाला मालकाच्या मर्जीप्रमाणे वागायला 'शिकवणे' आणि

१०४ / नराचा नारायण