पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खीळ घालतो.त्यामुळे शेती उत्पन्नाची वाढ होत नाही. व्हाव्हिलोव्हने विनवून सांगितले की, आपण थंड डोक्याने प्रयोग करू.एका शेतात तुमच्या पद्धतीने गहू करू, एका शेतात आमच्या. पाहू कोणाचे नाणे खरे ठरते ते.पण असली आव्हाने स्वीकारायला लायसेंको कच्च्या गुरूचा चेला नव्हता.तो म्हणाला, क्रांती करताना लेनिनने जॉर्जियासारखा एखादा प्रांत प्रयोग म्हणून भांडवलशाही अमलाखाली ठेवला काय ? क्रांतीने आमचे कल्याण होणारच. त्यात प्रयोग कसले करता ? व्हाव्हिलोव्हचे प्रयोग सगळे झूट आहेत.
 व्हाव्हिलोव्ह म्हणे की, पाश्चात्यांच्या विज्ञानाला उगाच बोल लावू नका.त्यांचे संकरित वाण तयार करण्याचे तंत्र मक्याच्या उत्पादनात अफाट वाढ घडवते आहे अधिकाधिक शेतकरी मक्याच्या नव्या संकरित जाती वापरू लागले आहेत.आत्ताच १० टक्के जमीन नव्या जातीखाली आली आहे.त्यावर लायसेंको उलट टोला मारी की, बघा व्हाव्हिलोव्ह आपल्याला कसा बनवतोय.खरे तर त्याच्याच सांगण्यानुसार ९० टक्के जमीन अजूनही जुन्या पक्क्या पद्धतीनुसार कसली जात आहे. न्हाव्हि- लोव्हचे अनुयायी म्हणत की, आमच्या कामाचा जगभर झालेला बोलबाला पाहा.यावर लायसेंकोवादी म्हणत की, ही भांडवलशाही जगाची आम्हांला फसवण्यासाठी केलेली चलाखी आहे.हिटलर जगावर जर्मनवंशाची सत्ता लादू पाहातो आहे.मेंडेलचे सिद्धांत ही त्याची स्फूर्ती आहे.मैडेलचे अनुयायी फॅसिस्ट आहेत.समाज विरोधी आहेत.असला अभ्यास, असले संशोधन बंद करा.यापुढे सर्व संशोधन मार्क्सवाद, लेनिनवादाला धरूनच झाले पाहिजे.

 १९३२ ते १९४२ या दशकात वैद्यक, पशुपालन, शेती या सर्व क्षेत्रांतून व्हाव्हिलोव्हच्या मतांना अनुकूल असलेले आणि त्या त्या क्षेत्रात उच्च पदावर असलेले अनेक बडे शास्त्रज्ञ ठार झाले.त्याहून अनेकांनी केविलवाणी निवेदने देऊनःआपले मतपरिवर्तन झाल्याची ग्वाही दिली.या सगळ्या काळात रशियाबद्दल सहानु- भूती असणाऱ्या अनेक परदेशी शास्त्र व्हाव्हिलोव्हचे कर्तृत्व आणि लायसेंकोची लफंगेगिरी याबद्दल रशियन शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.१९३६ सालच्या रशियन राष्ट्रीय परिषदेमधे व्हाव्हिलोव्हबद्दल लायसैकोबादी लोक गान्हाणी मांडत असताना एच. जे. म्यूलर हा आघाडीचा अमेरिकन शास्त्रज्ञ उपस्थित होता.त्याने

लायसेंकोचा उदयास्त / २०७