पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पेशीच्या आत घुसून तिच्या केंद्रस्थानाचा ताबा घेऊन हे व्हायरसचे कण ध्या पेशी- करवी आपल्या प्रतिकृती ( अपत्य ) घडवून घेतात. पेशी हा एक रसायनांचा कार- खाना मानला, तर केंद्रस्थानची रंगसूत्रे अन् त्यांवरचे जीन्स हे त्या कारखान्याचे मॅनेजर होत. व्हायरसजवळ या मॅनेजर मंडळींवर हुकमत गाजवण्याची शक्ती असते, हे व्हायरस काय किंवा पेशीच्या केंद्रस्थानची रंगसूत्रे काय, हव्या त्या रसा- यनांची निर्मिती कशी घडवून आणतात हे कोडे सुटायला फार काळ लागला. १९५७ साली वॉटसन आणि क्रिक या शास्रज्ञांनी केंब्रिज विद्यापीठात हा शोध लावला. त्यांनी रंगसूत्रांची रासायनिक रचना शोधून काढली. याबद्दल त्यांना पुढे नोबेल पारितोषिकही मिळाले. या संशोधनाची मनोरंजक कहाणी वॉटसनलिखित ' डबल हेलिक्स' या पुस्तकातून अवश्य वाचण्याजोगी आहे. या रसायनाला डी एन् ए किंवा डी-ऑक्सीरिबो न्यूक्लिइक अॅसिड असे नाव आहे. मराठीत अशोक पाध्यांच्या 'डी एन् एचे गोल गोल जिने ' या पुस्तकात यासंबंधी वाचायला मिळेल.

 गर्भाच्या वाढीच्या संदर्भात सांगण्याजोगी आणखी एक गोष्ट म्हणजे जुळी. कचित एकाऐवजी अधिक अंडी फलित झाली आणि गर्भाशयात येऊन स्थिरावली, तर जुळी - तिळी वगैरे जन्माला येतात. क्वचित एकच अंडे फलित होऊनही त्याची वाढ होताना म्हणजे एका पेशीच्या दोन, दोनाच्या चार होताना या पेशी एकत्र बांधून राहण्याऐवजी दोन गटात वेगळ्या होतात. यांतून दोन गर्भ तयार होतात. हीसुद्धा जुळीच. पण यांना आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात. यांची सर्व रंगसूत्रे आणि जीन्स (गुणबदलाचे फार क्वचित घडणारे अपघात वगळता ) सारखेच असतात. म्हणजे या जुळ्यात दोन्ही मुलीच किंवा दोन्ही मुलगेच असणार. मोठेपणी यांच्यात फरक दिसले तर ते रंगसूत्रातील (अनुवांशिक ) फरकामुळे नसून, परिस्थितीतील बदलामुळे असतील असा तर्क करता येतो. त्यामुळे जुळ्यांचा अभ्यास फार उपयुक्त ठरतो. कोणी म्हणतात की, पुरुषाला संसारातल्या काळजीमुळे टक्कल पडते. मग अशा जुळ्यांपैकी एक सुखवस्तू असेल व दुसऱ्याची ओढाताण होत असेल, तर पहिल्याला कभी टक्कल पडायला हवे. प्रत्यक्षात दोघांना एकाच वेळी टक्कल पडते. एवढेच नव्हे, तर टकलाचा आकारही अगदी सारखा असतो. यावरून निष्कर्ष निघेल की, car ही गोष्ट रंगसूत्रे आणि जीन्स यांमुळे ठरते. पण जुळी मुळात कमी. त्यातून

घेवडे, घुंगुरटी आणि घोटाळे / ३५