पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भ शोध, संकलन, प्रक्रिया, प्रेषण इत्यादी कार्य करून आपले शिकवणे रंजक, अद्ययावत करू शकतो.
* ब्लॉग्ज, विकीज्, प्लॅटफॉर्म
 'ब्लॉग' म्हणजे इंटरनेटवरचं स्वत:चे व्यासपीठ. त्यावर आपण आपले म्हणणं, मत मांडू शकतो. शंका, प्रश्न विचारू शकतो. ते वाचणारे आपलं मत, माहिती देऊन समर्थन करू शकतात. शंका निरसन करू शकतात. प्रतिक्रिया, प्रतिसाद, समर्थन, विरोध इत्यादीद्वारे वादविवाद होत राहतात. खंडनमडनातूनच ज्ञानविकास, विस्तार, प्रचार, प्रसार होत असतो. याद्वारे शिक्षक, विद्यार्थी, पालक एकमेकांशी संपर्क, संवाद, देवाणघेवाण, विचारविनिमय करू शकतात. 'ईपल्स', 'किड ब्लॉग', 'एज्यु ब्लॉग', 'ब्लॉगर,' 'पोस्टरस', 'वर्ड प्रेस', 'टाइप पॅड', 'लाइव्ह जर्नल', 'टंबलर', 'ट्वेंटीफर्स्ट क्लास', 'मूडल', 'ड्रपल' असे ब्लॉग्ज आहेत. ती त्याद्वारे तुम्ही जगभर संवाद करून व्यक्त होऊ शकता. स्वत:ला समृद्ध करणारे हे साधन. याद्वारे शिक्षक स्वत:ची वेबसाईट, वेबपेज सुरू करू शकतात. वर्गाची माहिती, उपक्रम, वैशिष्ट्य जगासमोर आणू शकता.
 'विकीज' म्हणजे वरील गोष्टी एकट्यादुकट्यानं न करता सामूहिकपणे करणे. उदाहरणार्थ, तुमच्या वर्गाला किंवा शाळेला गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची आहे. तुम्ही एकटे कराल, तर हजार रुपये जमा करू शकाल, पण तेच आवाहन शंभर वर्ग, शाळांनी मिळून केलं तर लाख रुपये जमा होतील. तीच गोष्ट एखादे जनमत, जागृती करण्याची. तुम्ही लोकमत संग्रह, संगठन विकीजद्वारे करू शकता. एकीचे बळ, समूह शक्तीचा आविष्कार म्हणजे विकिज. 'विकिपिडिया' सारखा विश्वकोश तयार होणं हा त्याचा मूर्त पुरावा म्हणून सांगता येईल. या विश्वकोशातील माहितीत प्रत्येक जण भर घालत तो कोश समृद्ध व अद्ययावत करत असतो.
 'प्लॅटफॉर्म' हे एक संसाधन आहे. (Hardware) आहे. ही एक संचलन व्यवस्था आहे. त्याची मदत घेऊन शिक्षक, विद्यार्थी, पालकांना अनेक गोष्टी मोफत करता येतात. उपलब्ध होतात. ही एक नि:शुल्क इंटरनेट सेवा असून त्याद्वारे आपण मोफत वेबपेज, वेबसाइट इ. तयार करू शकतो, 'गुगल', 'वेब्ज', 'योला' सारखी संकेतस्थळे तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर असतात.
* चित्र विकासक
 इंटरनेटवर अशी काही संसाधने आहेत की, जिच्याद्वारे शिक्षक चित्रं,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७९