धोरणी, धीरोदात्त आणि सरकारवर अचूक मारा करणारा वीर तेथें असतां आपण त्या जागेसाठीं उभे राहावें ही कल्पनाही त्यांच्या मनांत नव्हती. कायदे कौन्सिलांत जावयाचें म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढावी, मानमरातब व्हावा, सरकारी मेजवान्यांस हजर राहतां यावें असें गोपाळरावांस स्वप्नांतही वाटले नसेल, तेथें जावयाचें यासाठींच, कीं जरी सरकारपुढे 'अरण्यरुदन' असले तरी तें करून लोकांचीं गाऱ्हाणीं वेशीवर टांगावयाची; सरकारला स्वकर्तव्याची जाणीव नीट शब्दांत करून द्यावयाची. सरकारच्या हातांत सत्ता असली तरी, लोकपक्षीय प्रतिनिधीनें सरकारचा अधःपात दाखविला म्हणजे उघड्या माथ्यानें तरी सरकारास मिरवितां येणार नाहीं आणि त्याचें मन तरी त्यास खात राहील खास, हाही कांहीं अगदीच टाकाऊ फायदा नव्हे. हें जबाबदारीचे काम मेथांनी आजपर्यंत उत्तम प्रकाराने पार पाडिलें होतें. त्यांची जागा आतां भरून काढावयाची होती. गोखल्यांस वाटलें कीं, आपण या जागेसाठीं उभे राहावें. मनांत खळबळ सुरू झाली आणि त्या भरांत त्यांनीं १५ जानेवारी १९०१ रोजी फेरोजशहांस पत्र लिहिलें. त्यांत ते खालील- प्रमाणे लिहितात:-
'I was hoping that you would, even if you did not stand for a fresh election at any rate complete your present term which does not expire till the middle of 1902; that during that time I might show some useful work in the local Council so that when you retired, you might consider me as not quite the least deserving among those who are working for public good in this presidency, at a good respectful distance behind you.' - याचा सारांश असा आहे की, 'आपण आपली इच्छा नसली तरी निवडणूक संपेपर्यंत राजीनामा देऊं नये. तोपर्यंत मला प्रांतिक कौंसिलांत कांहीं तरी उपयुक्त कामकाज करून लायकी दाखवितां येईल. म्हणजे मग आपणांस मी अगदीं कच्चा शिष्य आहे असें वाटणार नाहीं.' गोखल्यांनी गेल्या वर्षी प्रांतिक सरकारच्या अंदाजपत्रकावर टीका करितांना दुष्काळांतही दयाळू सरकार कसें दुष्ट असतें हें
पान:ना. गोखले चरित्र.pdf/११०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
मेथांचा राजीनामा.