Steamed up from Cairo's Swamps of pestilence
Even so, my countrymen! have we gone forth
And borne to distant tribes slavery and pangs
And, deadlier far, our vices, whose deep taint
With slow perdition murders the whole man,
His body and his soul!"
खरोखरच या इंग्लंडने आमचें शरीर आणि शरीरांत वास्तव्य करणारा मानस-हंस यांस कायमचें पंगू केलें आहे. या राष्ट्राने इतरांच्या स्वातंत्र्याचे कैवारी असे स्वतःस म्हणवून घेणें म्हणजे रावणाप्रमाणें आपल्याच हातानें 'शाबास माझी धृति' अशी पाठ थोपटून घेण्यासारखें आहे. नुकत्याच झालेल्या महायुद्धांत चिमुकल्या बेल्जमच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंड युद्धांत पडलें! काय पण शब्द! महात्मा गांधींनी तर स्पष्टच सांगितलें कीं, जर्मनी जितका दोषी तितकेच इंग्लंडही दोषी आहे. एडवर्ड कार्पेटरने हीच गोष्ट सिद्ध केली आहे. हॅरिसन या ग्रंथकाराने आपल्या नॅशनल प्रॉब्लेम्स या प्रकरणांतील लेखांत इंग्लंडच्या गेल्या शतकांतील धोरणावर हीच टीका केली आहे. तो 'Empire and Humanity' या निबंधांत स्पष्ट लिहितो. 'What race, which hemisphere, what latitude, has not seen the unsheathed sword of Britain?' आणि खरोखर, हेंच ब्रिटनचे यथार्थ वर्णन आहे. इतर राष्ट्रांतील चळवळी पाहून आणि स्वतःच्या देशांतील धांगडधिंगा पाहून नवीन सुशिक्षित लोकांस निराशा वाटू लागली. हिंदुस्तानांतील पैशानें अवाढव्य खर्चाची युद्धे उत्पन्न करावी हें इंग्लंडचें धोरण! अफगाण युद्धावर टीका करितांना हॅरिसन म्हणतो, "War wanton and cruel presents to our eyes the element of evil that it must throw back the task of administering our Indian Empire. A war which to every circumstance of injustice, bad faith and barbarity, adds the crushing load of exaction wrung from 200 millions of our fellow-subjects." व अशा लढायांत होणारा अवाढव्य खर्च हिंदुस्तानच्या बोडक्यावर! याशिवाय बढ्या अंमलदारांचे पगार व अत्यंत अप