पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११५
बंगालच्या फाळणीचा दिवस - १६ आक्टोबर १९०५.

बंगालला फोडणें, आसामची भरभराट दाखविणें, आणि सिव्हिल सर्वंटांचा फायदा. खरें पाहिलें तर बिहार, ओरिसा, छोटानागपूर हे तीन प्रांत एकीकडे काढून त्यांचा निराळा प्रांत बनविला पाहिजे होता. परंतु तसें केल्यास सिव्हिल सर्व्हंटांचा घुस्सा होणार होता. या फाळणीमुळे साहेबांस किती गोष्टी साधावयाच्या होत्या पहा:-
 "This fair Province has been dismembered to destroy growing solidarity of the people, check their national aspirations and weaken their power of co-operating for national ends, to lessen the influence of their educated classes with their countrymen and reduce the political importance of Calcutta." १६ आक्टोबर १९०५ रोजी फक्त सरकारी सभासद हजर असतां हा कायदा पास करण्यांत आला, आणि तो दिवस बंगालमध्ये सुतकासारखा पाळण्यांत आला. परंतु या काळ्यांतूनही पांढरें बाहेर पडलें. या कडू कवंडलामध्येही एक अमृताची बी सांपडली.
 "For the first time since British rule began, all sections of the Indian community, without distinction of caste or creed have been moved by a common impulse and without the stimulus of external pressure, to act together in offering resistance to a common wrong.- The most astounding fact of the situation is that the public life of this country has received an accession of strength of great importance, and for this all India owes a deep debt of gratitude to Bengal."
 नंतर गोपाळराव स्वदेशी आणि बहिष्कार यांकडे वळले. त्यांनी सांगितलें कीं, ज्या प्रसंगी सर्व लोक एका झेंड्याखाली जमा होतात, अशा वेळीं बहिष्कार हा कायदेशीर आहे. स्वदेशीमधील पवित्र भावना आणि आर्थिक फायदाही त्यांनी स्पष्ट केला. नंतर आपले ध्येय काय असावे याची त्यांनीं मीमांसा केली. लोकांस जास्त जास्त हक्क दिल्याशिवाय ते हक्कांस लायक होत नाहीत. 'केल्यानें होत आहे रे, आधीं केलेच पाहिजे,' 'It is liberty alone which fits men for liberty,