पान:ना. गोखले चरित्र.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
शिल्लकेचा उपयोग लोकांचें आरोग्य वाढविण्याकडे करा.

पाहून सरकारच्या चित्तास कांहींच वाटू नये हें आश्चर्य होय. सरकार 'आम्ही राष्ट्रीय कर्ज वारतों' असें सांगतें. परंतु इतर देशांच्या मानानें हे कर्ज कांहीं फारसें नाहीं. गोखले म्हणतात, 'The further reduction of this small debt, is not a matter of urgency and can well wait, when the money devoted to it, may be far better employed in saving the lives of the people' स्थानिक संस्थांना आरोग्य सुधारणें अशक्यप्राय आहे हेही त्यांनी स्पष्ट सांगितले. जेव्हां जेव्हां शिल्लक उरेल तेव्हां तेव्हां ती प्रांतिक सरकारांत वांटावी आणि तिचा लोकांच्या आयुरारोग्यार्थ उपयोग होणें हें अत्यंत इष्ट व जरुरीचें आहे. रेल्वेसाठीं निराळें कर्ज काढावे परंतु ते कर्ज शेतकऱ्यांच्या पैशांतून वारणें म्हणजे महापाप होय. रेल्वे भरभराटत आहेत, त्यांच्या नफ्यामधून हळूहळू कर्ज वारावें किंवा व्याज भरावें. परंतु गोखले म्हणतात, 'It seems to me most unfair that the loans thus raised should be supplemented by the proceeds of taxation.'
 यानंतर रुप्याच्या नाण्यापासून- टांकसाळीपासून दरवर्षी होणारा पांच- सहा कोटींचा फायदा हा कशासाठीं खर्च व्हावयाचा तें सरकारने सांगितलें पाहिजे, असे सांगून गोखल्यांनी त्याच्या उपयोगाची दिशा दाखविली कीं, "The Government ought to adhere to the idea of the fund merely serving as a guarantee for the maintenance of a stable exchange.' सरकारनें पुढील साली तरी या बाबतीत आपला विचार सांगावा असे म्हणून ते दुसऱ्या प्रश्नाकडे वळले.
 अफूचें येणारें जें उत्पन्न आहे त्यासंबंधीं ते म्हणाले, 'I confess I have always felt a sense of deep humiliation at the thought of this revenue, derived as it is practically from the degradation and moral ruin of the people of China.' हिंदुस्ताननें जर हा व्यापार सोडला तर त्याचें जें नुकसान होईल त्याची भरपाई करण्यासाठी, हिंदुस्तानसरकारला ब्रिटिश खजिन्यांतून कांहीं रक्कम बहाल करण्यांत यावी असें जें कित्येक ठिकाणी ध्वनित करण्यांत येत होतें त्यासंबंधीं गोखल्यांनी आपले म्हणणे सांगितलें, की इंग्लंडकडून अशी