'दया क्षमा शांति । तेथें देवाची वसती ॥' या व अशा प्रकारच्या शेंकडों उद्गारांवरून हिंदुधर्माचें उज्ज्वल स्वरूप हेंच दिसतें कीं, ईश्वर स्वर्गात विलसत नसून, तो प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर अधिष्ठित झालेला आहे. तेव्हां वरच्या अभंगांत दर्शविल्याप्रमाणें जो सर्वांस आपल्या कुटुंबाप्रमाणे लेखतो त्याच्या जवळ पारलौकिक प्रश्नच उरत नाहीं. परलोकांत जे मिळवावयाचें तें त्याच्या हृदयमंदिरांत येऊन बसलेलेच असतें, हिंदु लोकांस जनसेवा म्हणजे धार्मिक भावनामय परमेश्वरास आवडणारे कृत्यच वाटतें. भिकाऱ्याला दान करणें किंवा रस्त्यावरचा दगड दूर करणें या साध्या गोष्टीतही धार्मिक भावना आहे. जर साधारण मनुष्यालाही प्रत्येक गोष्ट धर्ममय वाटते तर जनसेवेसारखे लोकोत्तर नैष्ठिक व्रत ज्याने घेतले त्याला धार्मिक स्फूर्ति कां वाटू नये?
गोखल्यांनी पैसे मागितले म्हणजे या संस्थेसाठी गोपाळरावांनी पैसे कसे मिळविले हें त्यांचे त्यांनाच माहीत. त्यांना फार श्रम झाले, अत्यंत दगदग झाली, परंतु पोटच्या पोरापेक्षांही संस्था त्यांना प्यारी. स्वतःचे स्मारकच त्यांनी जणूं उभारून ठेवलें. आपले कर्तृत्व, आपलीं ध्येयें, आपले जीवन सर्वस्व त्यांनी येथे ओतलें, गोखल्यांस मुंबईच्या धनिक लोकांचा पाठिंबा चांगलाच असे. पारशी समाजांतही त्यांचें वजन होतें. त्यांस नकार कोण दाखविणार? अशा प्रकारचा निःसंग भिकारी दारीं येणें म्हणजेच खरोखर भाग्य! गोखले पुष्कळदां स्वतःच वाटेल तो आंकडा घालून श्रीमंत शेटजींकडे पाठवीत व लगेच शेटजींकडून पैसे येत. तुम्ही पैशाचे काय करतां असें कोण विचारील? त्याशिवाय जोपर्यंत वरिष्ठ कायदे- कौन्सिल कलकत्यास होते, तोपर्यंत दर वर्षी कौन्सिलच्या बैठकीहून परत येतांना गोपाळराव धनसंपन्न बंगाली जमीनदारांकडून, व लक्षाधीशांकडून दहावीस हजार रुपये घेऊन यावयाचे. गोपाळराव जोपर्यंत हयात होते तोपर्यंत पुष्कळ बंगाली लोक दर वर्षी नियमानें पैसे पाठवीत असत. गोखल्यांच्या या भारत सेवक समाजासाठी इंग्लंडांतील एका गरीब बाईनें एक गिनी पाठवून दिली होती. राजवाडे यांच्या ग्रंथप्रकाशनासाठी चिपळूणच्या एका गरीब माणसाने असेच एकदां चार आणे दिले होते. गोपाळरावांस त्या गिनीचे फार कौतुक वाटले व ते म्हणाले 'This is
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१८१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४९
समाजाकरितां गोखल्यांनीं घेतलेली अविश्रांत मेहनत.