पान:ना. गोखले चरित्र.pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
गोखल्यांचा मुत्सद्दीपणाचा युक्तिवाद.

white poor citizens request interviews of the ministers but generally they have no time or no inclination to listen to complaints. But we trust that the majority of the population will take no notice of the visit and will continue to battle against one of the greatest hests in our country." किती सडेतोड उद्दामपणाची आणि बेफिकीरपणाची ही भाषा! स्वातंत्र्य, सामर्थ्य, व संपत्ति यांचा हा प्रभाव आहे! मॉर्निंग पोस्ट ३० आक्टोबरच्या लेखांत कसें नागमोडी लिहितें पहा:- 'Citizenship, they will answer, involves duties no less than rights. It involves in particular the duty of living decently in conformity with the standard of the white man. Experience in South Africa shows that the Indian is not prepared to do this. He is disposed to live in his store, actually sleeping, in some cases, in close contact with the articles of food which he prepares to sell for consumation next day. Such habits revolt the white man. Inspection cannot stop such evils. Best way is to keep the Indian out. Prevention is better than cure.' अर्थातच या सर्व अडचणी गोरे लोक पुढे आणतील म्हणून गोखले या मार्गाने गेले नाहीत. 'But Mr. Gokhale— to his credit be it said- is too wise to use such arguments.' गोखल्यांनी जरी या गोष्टी पुढे आणूं दिल्या नाहींत तरी मॉर्निंग पोस्ट त्या सत्य आहेत असे ठासून सांगत आहे व त्यावर उपायही सुचवीत आहे. गोखल्यांनी एकच गोष्ट पुढे मांडली ती ही की, साम्राज्याचा हिंदुस्तान हा महत्त्वाचा घटक आहे. हिंदुस्तानांत राष्ट्रीय जागृति, व ऐक्य- भावना उत्पन्न झाल्या आहेत. जर हिंदु लोकांस येथे सर्वत्र मज्जाव होईल तर हिंदुस्तान बिथरेल. आणखी दुसरी गोष्ट, आतां हिंदुस्तानांतच नवीन कारखाने निघत असल्यामुळे तेथे जास्त मजूर लागतात. आणि हिंदुस्तानांतच मजुरांस मजुरी मिळू लागल्यावर इकडे येणारा प्रवाह आपोआप बंद होईल; अर्थात् हिंदी लोकांमुळे आपला देश गजबजून जाईल ही भीति निराधार आहे हे त्यांनी त्यांस पटविलें. ज्या अर्थी नवीन लोक फार येणार नाहींत, त्या अर्थी जे सध्या आहेत त्यांस योग्य व रास्त हक्क देण्यास कोणती अडचण आहे असा गोखल्यांनी सवाल टाकला. गोखल्यांचें हें सर्व करणें