पान:ना. गोखले चरित्र.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३
मुहूर्त ज्वलितं श्रेयो, न च धूमायितं चिरम् !

प्रांतिक कायदे-कौन्सिलांतील सभासद, राष्ट्रीय सभेचे चिटणीस व अध्यक्ष, अखिल हिंदी राष्ट्राचे पुढारी, रॉयल कमिशनवरील मेंबर, परराष्ट्रांत अधिकृत वकील, अनेक संस्थांचे संस्थापक, अशाप्रकारे त्यांचा तीस वर्षीचा आयुष्यपट चितारला गेला. मृत्यूचे वेळेस त्यांचं वय फक्त ४९ वर्षांचे होते. युरोपमध्ये, व अमेरिकेमध्ये लोक सार्वजनिक कामांत, देशाच्या कारभारांत पन्नाशी उलटल्यानंतर पुढे येतात. परंतु हिंदुस्तानांत पाहिले तर बुद्धि जास्त लवकर परिपक्क होत असे दिसतें. अकबर राज्यावर आला त्या वेळेस तो अवघा तेरा वर्षीचा होता. शिवाजी महाराजांनी तोरण्यावर तोरण बांधिलें त्या वेळेस त्यांस मिसरूडही फुटली नसेल. पहिला बाजीराव विसाव्या वर्षीच पेशवा झाला. आणि वीस वर्षांत आपल्या अतुल पराक्रमाने त्याने सर्वांस नमविले. पहिले माधवराव हे तर सोळा वर्षांचे असतां पेशवेपदावर अधिष्ठित झाले. आणि सर्व पेशवे मंडळांत कार्यकर्ता असे नांव त्यांनी मिळविले. परंतु गाडी जोराने चालविली तर बैल थकून जातात, त्याप्रमाणे या नरवीरांचे देह लवकर थकतात. आधुनिक महाराष्ट्राकडे नजर दिली तरी हेच चित्र दिसतें. चिपळूणकर, आपटे, आगरकर यांच्यासारखी रत्ने फारच लवकर दिवंगत झाली. त्यांचेच उदाहरण गोखल्यांनी गिरविले. गोखलेही हिंदुस्तानास फार दिवस लाभले नाहीत. परंतु केसरीतील मृत्युलेखांत अवतरण दिल्याप्रमाणे 'मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमायितं चिरम्॥' पुष्कळ धुमसून आजूबाजच्या लोकांस डोळे चोळण्यास लावण्यापेक्षां क्षणभर चमकावें आणि लोकांस मार्ग दाखवून द्यावा. गुलाब अल्पकाळ असतो, आणि सर्वांस रिझवितो; सुखवितो. परंतु तो कंटाकासनावर असतो हे विसरून चालणार नाहीं. 'न तपस्या तरि ना विकास' हें अबाधित तत्त्व आहे. टिळक सुद्धां त्यांच्यावर आलेल्या मानसिक, शारीरिक दगदगीला न जुमानतां इतके दिवस जगले याचे कारण ते स्वतःच सांगत, की 'मी जात्या कठोर अंतःकरणाचा आहे.' दगदगीचा मनावर व त्यामुळे देहावर ते फार परिणाम करून घेत नसत. गोखल्यांचे याच्या अगदी उलट होते. त्यांच्या मनावर फार परिणाम होई. कार्य करीत असतां, लढाया लढत असतां गोखल्यांम मरण आले. त्यांच्या मृत्यूने सर्व देश हळहळला. क्षणभर सर्व लोक भेदभाव विसरून गेले. त्यांनी आपल्या गुणांनी सर्वांची अंतःकरणें काबीज केली. आपल्या अल्प आयुष्य