क्रमांत ज्या महनीय गुणांनी त्यांनी ही अजरामर कीर्ति संपादन केली, त्या गुणांचं आपण थोडथोडें निरीक्षण करू या. या गुणांबरोबरच त्यांच्या उणिवा, त्यांचा स्वभाव, त्यांच्या कार्याची दिशा याचाही संक्षेपाने विचार करणं प्राप्त आहे.
त्यांच्या सर्व कामगिरीस पायाभूत झालेला गुण म्हणजे त्यांनी केलेला दांडगा अभ्यास. भावि कार्यास योग्य व (स)क्षम होण्यासाठी, त्यांनी देहाची पर्वा केली नाही. सतत दहाबारा वर्षे न्या. रानडे व रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांच्या जवळ त्यांनी देशांतील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांनी विशेषतः आंकडेशास्त्राचा जोश्यांजवळ फारच कसोशीनें अभ्यास केला. देशाची तरफदारी करणाऱ्यास सर्व खडान्-खडा माहिती असली पाहिजे. या दृष्टीने त्यांनी युरोपच्या इतिहासाचा फार मनन-पूर्वक अभ्यास केला होता. जुन्या राज्यपद्धति कशा अस्तित्वांत आल्या आणि त्यांत कसकसे फरक पडले यांचे त्यांनी काळजीपूर्वक ज्ञान मिळविले. बाच्छा म्हणतात :- "Nothing so broadens the mental horizon in politics as History. The angle of vision is greatly enlarged. Parochial views of men and things are superseded by catholic views. The parish is forgotten and all the world becomes his country. Nothing therefore, is more valuable than history and no accomplishment is more suited to him who aims at being a better citizen than the same subject."
गोखल्यांनी इतिहासापासून फार धडे घेतले. परंतु हें सर्व शिकून जर मांडता येत नसेल तर काय फायदा? म्हणून गोपाळरावांनी याही बाबतीत लहाणपापासून सक्त मेहनत घेतली होती. त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले. कोठे उत्तम शब्द, उत्तम वाक्य दिसले की तें यांनी आत्मसात् केलेच. बर्कसारख्या महापंडिताच्या ग्रंथांतील उतारे त्यांस तोंडपाठ असत. या सर्व तयारीमुळे इंग्रजी भाषा त्यांच्या जिव्हाग्रावर खेळू लागली. त्यांची भाषा सोपी, सहजसुंदर, परंतु जोरदार आहे. बंगाली वक्त्यांमधील अलंकार आणि मेथांच्या भाषेतील विनोद व कोटिक्रम हे गुण त्यांच्या भाषेत नाहीत. परंतु सरलता आणि मनोहरता तिच्यामध्ये आहे. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे 'कृताभ्यंगस्नाना कनकमणिभूषाविरहिता । विराजे
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२४४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
गोखल्यांची सहजमनोहर जोरदार भाषा.