फक्त खळबळ उडवीत. टिळकांनी मुंबईस स्पष्टच सांगितले होते, 'I do not think it is our duty to formulate constructive measures and help the Government which does not take us into its confidence by enabling us to share its highest offices, executive and administrative and bear the responsibilities of Government. Constructive measures are the duty of those who are responsible for the Government of the country and we are not responsible' या दोघांच्या मनांतील खात्रीमुळे दोघांनी दोन भिन्न भिन्न मार्ग अनुसरले. गोखल्यांनी सरकारशी शक्य तितकी सहकारिता करून सुधारणेचें पाऊल पुढे नेण्याचे काम अंगीकारलें; टिळकांनी सरकारास चापण्यासाठी लोकमताचा जोर उत्पन्न करण्याचे काम अंगावर घेतलें. यामुळे गोपाळरावांच्या कामगिरीस विधायक असे नांव मिळते आणि टिळकांची कामगिरी विध्वंसक असें सांगण्यांत येते. परंतु जमीन खणणं म्हणजे विघातक असे कसे म्हणता येईल? कोरड्या जमिनीवर बी पेरले तर ते उगवणार नाहीं, यासाठीं बी पेरण्यासाठी जमीन खणणें हेंही विधायक कामच आहे. टिळकांनी लोकांची मनें खणली, त्यांच्या मनांवर आलेले- जमलेले- निष्क्रियतेचे थर दूर करून हृदयांत सुप्त असलेला चैतन्याचा झरा त्यांस दाखविला. या कामगिरीस विध्वंसक कोण म्हणेल? फ्रेडरिक हॅरिसन साहेबांनी क्रॉमवेलविषयी लिहितांना म्हटले आहे :- "Destructive work in statesmanship, provided it be permanent, is ipso facta constructive, if it enables the new system to form and grow." पुनः ते अन्यत्र म्हणतात- 'No hard and fast line can be drawn between negative and positive act of the soldier and statesman; and it is misleading to attempt to distinguish negative from positive work. That destructive statesmanship should be constructive in result, requires important conditions. The destruction must be necessary and timely; it must be final.' टिळकांचे कार्य अशाच स्वरूपाचें होतें. अगदीं वेळेवर त्यांनी जनमनावर टोला हाणला. हृत्कपाटे फोडून आंत प्रकाशाचा इतका जोराचा झोत सोडला की, मनांतील सर्व किडे मरावे. अंतःकरणाचा दरवाजा उघडून प्रकाशानें मनांतील
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
गोखल्यांचे विधायकत्व व टिळकांचें विधायक विध्वंसकत्व.