पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
कौन्सिल सोडून लोकशिक्षणासच आयुष्य वाहण्याचा विचार.

the horizen of the peoples, liberate their conscience from the materialism by which it is weighed down set a vast mission before them, and rebaptise them.' गोखल्यांनी कार्य केलें. स्वतःच्या लोकोत्तर उदाहरणाने 'आधी केले मग सांगितले' याप्रमाणे ते वागले. त्यांच्या कामाची मुख्य दिशा आतां लोकशिक्षण ही होती. ते कौन्सिल सोडून आता लोकशिक्षणाकडे सर्व आयुष्य खर्च करणार होते. लाला लजपतराय यांनी देशांत काय केले पाहिजे, लोकांस काय पाहिजे, पुढाऱ्याने कशावर प्रयत्नांची झोड उठविली पाहिजे हे सांगतांना लिहिले आहे :- 'The position thus analysed resolves itself into an educational problem. View it from whatever point you choose, religious, moral, intellectual, social or industrial, the question of Indian progress is a question of education, This is, so to say, the question of questions upon the right solution of which hang the destinies of the nation, viz, how to educate the people so as to befit them for the performance of those duties, a proper discharge of which alone can secure for them their right position in the commonwealth. The car is a heavy one and those who care to join in carrying it must be men of strong convictions, indomitable will, irresistible energy and untiring perseverance; they must be men of action and men of honour.' असे लोक तयार होण्यासाठी गोखल्यांनी भारत-सेवक समाज काढला. देशांतील सुशिक्षणसंपन्न लोकांपैकी शेकडा दहा तरी लोक- निदान शेकडा एक तरी लोक या आपल्या कामास मिळावे अशी त्यांची इच्छा असे. मॉडर्न रिव्ह्यू म्हणतो :- It was his desire that educated Indians should levy a contribution upon themselves not in money, but in men for doing the work of the country.' अशा प्रकारच्या तरुणांनी आतां पुढे यावें. त्यागाशिवाय भोग नाहीं हा सृष्टीचा कठोर नियम आहे. त्यागानं पवित्र झालेले मिळविण्यांत आनंद आहे. आयतें आपल्या पदरांत कोणी घालणार नाहीं. जगांत असें उदाहरणच नाहीं. आणि आयतें मिळाले तरी त्यांत लज्जत नाहीं: स्वारस्य नाहीं; मान