पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५
नोकरशाहीची 'लोखंडी चौकट' भंगून टाकली पाहिजे.

कारण बेल्जमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या इंग्लंडने हिंदुस्तानास खुशाल डोळे मिटून ऐटीने तुडवाव हे त्यास जगत खाली मान घालण्यास लावील. गांधींनी तर स्पष्ट म्हटले आहे की जर्मनीनें लढाईत जे धोरण स्वीकारले तेंच इंग्लंडचे होते. मोठेपणाची फुकटची फुशारकी इंग्लंडला मिरवण्याची जरुरी नाही. जर इंग्लंडला हे खोटे करावयाचे असेल तर आयर्लंड, ईजिप्त, हिंदुस्तान यांसही इंग्लंडने हक्क दिले पाहिजेत. तीन कोटि लोकांस दास्यात ठेवणं हे अघोर पातक आहे. आणि सदैव असे मोठे राष्ट्र दास्यांत राहणारही नाही असे रानड्यांनी म्हटले आहे. 'युद्ध आणि त्यांतून सुटका' या पुस्तकांत लॅविस डिकिन्सन म्हणतो- 'Let no community be coerced under British rule, that wants to be self-governing. We have had the courage though late, to apply this principle to South-Africa and Ireland. There remains our greatest act of courage and wisdom to apply it to India.' इंग्लिश लेखकही असे लिहू लागले आहेत. परंतु लॉइड जॉर्जसारखे मुत्सद्दी मात्र अद्याप सनदी नोकरांस 'लोखंडी चौकटच' म्हणत आहेत. परंतु ही 'लोखंडी चौकट' आतां भंगून टाकली पाहिजे. या चौकटीतून आता बाहेर आले पाहिजे. आपल्या लोकांनी आतां धैर्य दाखविले पाहिजे. सरकार जर जनतेच्या आकांक्षा तृप्त करणार नाही तर दडपगिरीच्या कायद्यांचा डोंगर रचून देखील क्रांतिकारक चळवळ दडपून टाकता येणार नाही. आपले पुढारी आतां जास्त धीट झाले आहेत. एके काळी नेमस्त असणारे नेहरू, मालवीय यांच्यासारख पुढारी 'अन्याय्य कायदे मांडू' असं ठासून सरकाराम बजावीत आहेत. भर कौन्सिलमध्ये जिनासारखे तेजस्वी लोक काय सांगत आहेत पहा. 'ज्याप्रमाणे इंग्लंडातल्या नागरिकांनी जन्मसिद्ध हक्कांसाठी आपले रक्त सांडले, त्याप्रमाणेच प्रसंग आल्यास मी देखील याच हक्कांपायी आपल्या रक्ताची आहुति देण्यास तयार आहे.' कौन्सिल लोकनायक सरकारास असे स्पष्ट बजावीत आहेत; धोक्याची सूचना, इशारत देत आहेत. जनतेनें त्यांच्या मागे उभे रहावें म्हणून कौंसिलच्या बाहेर राहणाऱ्या लोकांनी टिळकांचं लोकजागृतीचे काम करावें. म्हणजे कौन्सिले व लोक यांच्या जोरावर आपल्या म्हणण्यास सामर्थ्य येईल; दुपट जोमाने कार्य होईल. लोकांत