पान:ना. गोखले चरित्र.pdf/२८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३
हिंदुस्तानच्या एकराष्ट्रीयत्वाचें मूर्त स्वरूप गोखले.

ग्याची व्यवस्था करण्यास झटणं, शिक्षण, व धंदेशिक्षण या बाबी समाजाच्या कार्यक्षेत्रांत येतात. गोखल्यांस स्वतः या बाबतींत काम करावयास फावलें नाही. परंतु त्यांच्या अनुयायांनी या गोष्टी केल्या पाहिजेत व ते करीतही आहेत.
 स्त्रियांस शिक्षण देण्यासाठी त्यांची अनुकुलता होती. स्त्रियांनी राजकारणांतही पडावें असें त्यांचं मत असावे असे त्यांनी सरोजिनीबाईस जें सांगितले त्यावरून दिसते.
 समाजांतील तंटेबखेडे नाहींसे व्हावे म्हणून मुसलमान बंधु व हिंदु यांत एकोपा पाहिजे. सय्यद अहंमद, मीरअल्ली यांसारख्या संकुचित दृष्टीच्या पुढाऱ्यांच्या उपदेशामुळे मुसलमान सरकारच्या तोंडाकडे पहात. आणि हिंदूंकडे क्षुद्र बुद्धीनें व वांकड्या नजरेनें पहात. हा दृष्टिकोन बदलण्याचे काम गोखल्यांनी १९०७च्या दौऱ्यांत बरेच केले. पुढे ना. आगाखान यांनी मॉस्लेम लीग स्थापली. ते व गोखले मित्र होते. यामुळे आगाखान, सरोजिनी, गोखले वगैरेंनी ऐक्य होण्यास एकमेकांस सवलती देऊ करून योग्य ती परिस्थिति उत्पन्न केली. गोखल्यांच्या मृत्युसमयीं दुःखप्रदर्शन करणाऱ्या एका सभेत ना. आगाखान म्हणाले; 'हिंदुस्तानला एकराष्ट्रीयत्व येणें शक्य नाहीं असे कित्येक म्हणतात; पण ना. गोखले हे एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचें मूर्तस्वरूप होते व त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने देशकार्य करीत राहणें हेंच त्यांचें उत्कृष्ट स्मारक होय.' मॉर्डन रिव्ह्यू मृत्युलेखांत म्हणतो :- 'India is a land of particularisms. Mr. Gokhale was one of the few Indians who rose entirely and altogether above them.' गोखल्यांस हिंदु-मुसलमानांच्या ऐक्यासाठी किती कळवळ वाटे, आणि त्यांचे मन त्याकरितां कसें तिळतिळ तुटे हें मागें दिलेच आहे. टिळकांनी शिवाजी उत्सव व श्री गजाननोत्सव सुरू करून हिंदुमुसलमानांत वितुष्ट आणले असे कित्येक म्हणतात त्यासंबंधी विवेचन आम्हीं मांगे केलेच आहे. जर हे दोन्ही समाज तुल्यबल झाले तर भांडणे होणार नाहीत असे टिळकांचं म्हणणं असे व तें अक्षरशः आणि तत्त्वतःही खरे आहे. अस्पृश्यतेचाही व्यवहारांत अंमल नाहींसा करावयास ते तयारच होते. मात्र केवळ भोजनपान एकत्र करणं म्हणजे अस्पृश्यता दूर करणे नव्हे असें त्यांचे मत होतें. भोजनपानाचे दुसरे पुष्कळ अज्ञात असे परिणाम होत असतात. 'आहार-