पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७
गोखल्यांचा अपूर्व स्वार्थत्याग.

डागही दिसतात. ताऱ्यांचे तेज अल्प, म्हणून डागही दिसत नाहीत. गटे याचा चरित्रकार लीप्येस म्हणतो, “The faults of a celebrated man are apt to carry an undue emphasis. They are thrown into stronger relief by the very splendour of his fame. His glory immortalises his shame.” असे असले तरी आपण गुणांकडेच दृष्टि वळविणे हे आपल्या हिताचे आहे. आणि पुष्कळ वेळा असेही असण्याचा संभव असतो की कांहीं गोष्टी आपण समजतों तशा नसतात. कदाचित् आपलीच चुकी होत असेल. गोखल्यांमध्ये थोडा अहंकार होता असे म्हणावयाची धिटाई आपण कशास करावी? 'It is never well to put ungenerous constructions when others, eqally plausible and more honourable are ready.' त्यांच्या अंगीं अहंकार होता असे म्हणण्याऐवजी स्वतःच्या मार्गाची त्यांस इतकी खात्री वाटत असे, असेच आपण म्हणावें.
 त्यांच्या सर्व आयुष्यांत स्वार्थत्याग हा सद्गुण सूर्यप्रकाशासारखा तळपत आहे. ‘The one pure, sacred and efficacious virtue, sacrifice, the halo that surrounds and sanctifies the human soul,' अशा प्रकारचा स्वार्थत्याग विरळा! त्यांनी गरिबीला आपखुषीने कवटाळले. शेवाळांतून जसे कमळ आपले डोके वर काढतें त्याप्रमाणें, जाति, पंथ, भेदभाव, स्वहित यांच्या चिखलांतून, या शेवाळांतून हें सुंदर पुष्प देशास दरवळून सोडते झाले. परंतु त्यांना नेहमीच चांगले दिवस लाभले नाहीत! 'Every gleam of sunshine in his life was chased by a gloomy shadow that undermined his constitution and hastend his end.' त्यांच्या अंतःकरणांत एक प्रकारचा उदासीनपणा होता. १८९७ साली जेव्हां त्यांच्यावर गहजब उडाला आणि त्यांनी क्षमा मागितली, तेव्हां त्यांनी आपले मित्र रा० वासुदेवराव आपटे यांस विचारले 'माझे करणे आपणास कसे वाटले?' 'देशाची अब्रू दवडणारे, अपमानास्पद वाटलें.' गोखल्यांना त्यांचं हे उत्तर ऐकून वाईट वाटलें. आपल्या करण्याने देशाची हानि झाली? 'अरेरे, ते ताबडतोब म्हणाले, "But a day will come when I shall cover my country with glory by way of compensation for the wrong I am alleged to have done and then critics of your type, who are now