पान:ना. गोखले चरित्र.pdf/३००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
थोरांच्या चरित्रांचे अध्ययन, मनन व अनुकरण करा.

 'Great hearts, strong minds, true faith and willing hands.

Men whom the lust of office cannot kill
Men whom the spoils of office cannot buy
Men who possess opinions and a will,
Men who have honour, men who will not lie."

मोठ्या लोकांप्रमाणे आपण सर्वच मोठे झालों तर त्यांचे महत्त्व काय उरले? परंतु सर्वांस तसें होतां आलें नाहीं तरी शक्य तो प्रयत्न करणें हें तरी प्रत्येकाचें कर्तव्य आहे की नाहीं? 'क्षुद्र माणसांच्या प्रगल्भ विचारांनी राष्ट्र तयार होतात.' विचार प्रगल्भ होण्यास थोरांच्या चरित्रांचें अध्ययन करावें, मनन करावें व तदनुसार कृति करण्यास लागावें म्हणजे आपल्या राष्ट्राची उन्नति होण्यास काय विलंब?