पान:ना. गोखले चरित्र.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
सोसायटीतील मतभेदाचा खरा मुद्दा.

स्वार्थत्यागी आणि बाकी सर्व पैशासाठी हपापलेले, असें आम्ही म्हणत नाहीं. ते पैशासाठी हपापलेले नसतील. त्यांना त्या वेळेस कुटुंबाच्या केवळ खर्चासाठीं जास्त पैसे पाहिजे असतील. टिळक म्हणत कीं, असे नियम करूं नका, ज्यास जरूरी आहे त्यास त्याची स्थिति लक्षांत घेऊन द्या जास्त पगार. आगरकरांची अडचण लक्षांत घेऊन त्यांस जास्त पगार द्यावा असें टिळक म्हणत होते. परंतु आतां संस्थेची स्थिति चांगली आहे तर सर्वांचीच बढती व्हावी या मताचा टिळकांना तिटकारा आला. एका टीकाकाराने तर टिळकांस त्यांच्या वडिलांनी ३००० रुपये ठेविले होते, तेव्हां त्यांस आगरकरांसारख्या इतर विपन्न माणसांची जरूर काय समजणार असें लिहिलें आहे; परंतु ते कुत्सित आहे. टिळकांच्या घरी पुष्कळ पैसा असेल; तो दुसऱ्यास अडचणीच्या वेळी त्यांनी दिलाही असेल, परंतु म्हणून आपल्या नियमांत फरक करावा असें थोडेंच आहे. टिळक निघून जाण्यास हेंच मुख्य कारण असावें. कारण यांत इतर मतांस जागा नसून, ज्या हेतूनें ही शिक्षणसंस्था काढिली तिच्या मूलभूत तत्त्वांवरच गदा येत होती. टिळक हे तत्त्वाचे भुकेले असत, व्यक्तीचे नसत. व्यक्ति- मग ती कितीही थोर, विद्वान्, स्वार्थत्यागी असो- त्या व्यक्तीस आपल्या मतांसाठींच टिळकांना दुखवावें लागलें; यासाठींच त्यांस आमरण झगडावे लागलें. गोखले हे प्रोफेसर झाल्यामुळे टिळकांस त्यांचा हेवा वाटू लागला, गोखले हे आपले प्रतिस्पर्धी आहेत असें टिळकांना वाटलें आणि ते गोखल्यांचा हेवा करूं लागले, पुढें मागें हा आपल्यावर ताण करील आणि आपला लौकिक मागें पडेल असें टिळकांस भय पडलें असें प्रि. परांजपे आपल्या छोटेखानी इंग्रजी चरित्रांत लिहितात. "Mr. Tilak saw soon after Gokhale's admission to the society that here was a man likely to be his formidable rival" परंतु या लिहिण्यांत कांहीं अर्थ नाहीं. या वेळेस गोखले इंग्रजी शिकवीत असत तें सुद्धां त्यांस मुलांना मनोरंजक करून शिकवितां येत नसे. इतिहास व अर्थशास्त्र टिळक सोडून गेल्यावर ते शिकवूं लागले. आणि १८९७ नंतर त्या विषयावर ते अधिकारी या नात्यानें सांगत. परंतु आज १८८७