केले तें बालक इतरांच्या स्वाधीन करून, मोठ्या कष्टानें परंतु धीरानें आपल्या तत्त्वासाठीं ते बाहेर पडले. ते बाहेर पडले हेंच बरें झालें. कारण हा नरसिंह शाळेतच कोंडला गेला नाहीं हें देशाचें भाग्यच समजावयाचें. त्यांनीं आपल्या केसरीनें महाराष्ट्र खडबडविला आणि देशाबद्दलचे विचार सुप्तांतःकरणांत जागे केले. 'टिळकांनी पहा आपला आजन्म सेवेचा करार न मानतां कॉलेज सोडलें, उभारलेली संस्था ते टाकून गेले, आपल्या मागे संस्थेचे काय होईल याची त्यांस फिकीरही वाटली नाहीं.' असे उद्गार पुष्कळांच्या लेखणींतून आणि तोंडांतून ऐकूं येतात. परंतु तत्त्वाचा खून करून संस्था चालविण्यापेक्षां ती संस्था समजा, मेली तरी तिच्याबद्दलं टिळकांना तितकें वाईट वाटलें नसतें. स्वामिभक्तीसाठी पन्नेला स्वपुत्राचा बळी द्यावा लागला. तत्त्वनिष्ठेसाठी टिळकांस स्वतःचे गोजिरवाणें अपत्य टाकणें भाग पडले. ही कठोरता म्हणजे कर्तव्यनिष्ठुरता. कर्तव्य कठोर असते; फुलांवर निजणें नव्हे किंवा हत्तीवर झुलणें नव्हे. याशिवाय संस्थेचा संबंध तोडून जर संस्थेच्या चालकांनी त्यांस एकादा विषय शिकवा, आमची अडचण आहे असें म्हटलें असतें तर त्यांनीं कधीं नाकारलें नसतें. त्यांच्या आठवणीत अशी गोष्ट दिली आहे: "टिळकांनीं जेसुइट तत्त्वाचा पुरस्कार करून स्वतःच वर्तमानपत्र चालवून खूप पैसा मिळविला" असाही एक आक्षेप आहे. परंतु जेसुइट तत्त्व संस्थेला बंधक होते; संस्थेबाहेर नव्हते. संस्थेबाहेर जेसुइट राहीन असे टिळक म्हणत नव्हते तर संस्थेत राहिलों तर जेसुइटच राहीन आणि सर्वांनीं राहिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे. संस्थेच्या बाहेर पडल्यावर त्यांच्यावर दुसऱ्या जबाबदाऱ्या, दुसरी कार्ये आली. आतां त्यांचा संस्थेशीं, तिच्या तत्त्वांशीं काय बरें संबंध होता? तेव्हां याही आक्षेपास जागा आहे असे आम्हांस वाटत नाहीं. असो.
सोसायटींत आतां एकवाक्यता झाली. आतां सर्व सुधारकांचा मेळा जमला. काम सुरळीत चालूं लागलें. वादविवाद थांबले. शांतीचें राज्य झाले. परंतु गोपाळरावांवर आतां नवीन जबाबदारी येऊन पडली. टिळक सोडून गेल्यावर टिळकांची बाजू सांवरणारे नामजोशी पण सोडून गेले. नामजोशी यांस संस्थेचे 'फॉरिन् सेक्रेटरी' असें विनोदानें म्हणत
पान:ना. गोखले चरित्र.pdf/६०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
सोसायटीवर गोपाळरावांचा पूर्ण ताबा.