आलेले, जवळ ना स्नेही, ना मित्र, ना नात्यागोत्याचा आप्त! परंतु वाच्छा व दादाभाई तेथें होते. वाच्छांनी ही बातमी दादाभाईस सांगितली. त्यांनी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरास निमंत्रण पाठविले आणि ते स्वतः गोपाळरावांचीं कळ कमी होण्याचे प्रथमोपचार करीत बसले. दादाभाईस आपली शुश्रूषा करावी लागत आहे हें पाहून गोपाळराव गोंधळले. दादाभाईंबद्दस त्यांस किती पूज्यभाव वाटे हें १८९३ मध्ये जेव्हां दादाभाई पुण्यास आले होते आणि त्या वेळेस त्यांचें जें थाटाचें स्वागत झाले होतें त्या प्रसंगी दिसून आलें होतें. दादाभाईच्या जवळ आपण असावें असें त्यांस त्या वेळी वाटे. परंतु ज्या गाडीतून मिरवणूक निघत होती त्या गाडीत जागा नव्हती. तेव्हां गोपाळराव घोडे हांकणाराजवळच जाऊन बसले आणि आपल्या मनींची इच्छा त्यांनीं सफळ करून घेतली; असो. डॉक्टर आला; छाती तपासण्यांत आली; दुखणे किती जोखमीचें आहे हे डॉक्टराने सांगितलें. थोडक्यांत चुकले नाहीं तर प्राणांवरच बेतावयाचें! औषधोपचार सुरू झाले. पहिले दोन तीन दिवस फारच काळजी वाटत होती. हळूहळू सुधारणा होत होती. कांहीं दिवस अंथरुणावर पडणेंच त्यांस भाग होते. कारण डॉक्टराने तसे सांगितलें होतें. ज्या घरांत ते रहात असत त्याच घरांत एक फार ममताळू पोक्त बाई होत्या. ज्या शेरिडननें हिंदुस्तानची करुण कहाणी पार्लमेंटांत सांगितली त्या शेरिडनच्याच वंशांतली ही बाई होती. तिचे नांव मिसेस कॉन्ग्रीव्ह. या बाईनें गोपाळरावांची बरदास्त फार उत्तम ठेविली. शुश्रूषा खरोखर स्त्रियांनीच करावी. गोखल्यांची जास्त उत्तम व्यवस्था घरीही झाली नसती. गोपाळराव प्रसन्न रहावे- त्यांचें मन चिंताग्रस्त नसावं यासाठीं कॉन्ग्रीव्ह बाई खटपट करी. ती त्यांच्याजवळ बोलत बसे. तिच्याबरोबर बोलण्याचालण्यानें गोखल्यांचा भिडस्तपणा जाऊन आतां नैसर्गिक चौकसपणा व मोकळेपणा त्यांच्या वागणुकींत आला. ते पंधरा दिवसांनीं हिंडूं फिरू लागले. ३१ मे १८९७ रोजी युनिव्हर्सिटीतर्फे बोटिंगच्या शर्यती होणार होत्या. त्या पाहण्यास गोखले, वाच्छा व दादाभाई त्रिवर्ग गेले होते. दादाभाईंनी जरी ४०-४२ वर्षे इंग्लंडमध्ये काढली तरी ते ही गोष्ट पहाण्यास कधीं गेले नव्हते. ही त्यांची विरक्तता पाहून गोपाळ
पान:ना. गोखले चरित्र.pdf/९०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
गोखल्यांचा छातीतील दुखण्याचा आजार.