पान:नित्यनेमावली.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संत होऊन गेल्याचे वाचकास माहीत असेलच. त्याचप्रमाणें रेवण- नाथाच्यां सांप्रदायांत काडसिद्ध, निंबरगीमहाराज वगैरे साधुसंत होऊन गेले आहेत. श्रीकाडसिद्धांचें स्थान करवीरनजीक सिद्धगिरी नांवाचा डोंगर आहे, तेथे आहे. श्रीकाडसिद्ध यास सर्व लिंगायत लोक शंकररांश मानून ते अयोनिसंभव होते असेंही मानतात व त्यांच्या धर्माचा मुख्य उपदेशक जो बसव त्यापेक्षाही ते काडसिद्धांस जास्त मान देतात; कारण बसव हे फक्त नंदीचे अवतार असून श्रीकाडसिद्ध हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहेत. पुष्कळ लिंगायतधर्मानुयायी लोक आत्मज्ञानी होऊन गेले, हे त्यांच्या पुष्कळ संतांनी केलेल्या प्रेमळ आणि अनुभविक पदांवरून स्पष्ट होतें. ह्या पदांची एक कुसुमावली करण्याचें आमच्या एका मित्रांनें ठरविले आहे; व त्याप्रमाणें ते त्या कार्यासही लागले आहेत. आत्मज्ञानी लोक कोणत्याही धर्मात अथवा धर्मशाखेत असोत; ते लिगायत असोत, वैष्णव असोत, दत्तोपासक असोत आत्मज्ञान झाल्या- बरोबर तें एकमेकांशी कशा सलोख्यानें वागतात याचें एक उत्कृष्ट उदाहरण श्रीज्ञानदेवमहाराज यांच्या गायेंत सांपडण्याजोगे आहे:-
 ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदीं । मिळाली संत- मांदी । त्याचे रजरेणु वंदी || बृ० || गुरुलिंग जंगम त्यानें दाविला आगम | आधिव्याधि झाली सम । तेणें विश्राम पावलोंडरे ।। १ ।। जवळी असतां जगज्जीवन | कां धांडोळिसी वन | एकाग्र करी मन ।