पान:नित्यनेमावली.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेणें होईल समाधान रे || २ || देहभाव जेथें विरे । ते साधन दिधले पुरें | वापरखुमादेविवरें | विठ्ठल विठ्ठल विठ्ठलुरे || ३ ||
 श्रीज्ञानदेव महाराज यांचे वेळीं सुद्धां आत्मज्ञानी जंगम होते हैं यावरून उत्कृष्ट रीतीने सिद्ध होतें; व त्यांची योग्यताही ज्ञानदेव- महाराजांनी कवूल केली आहे. असो.
 वर निर्दिष्ट केलेले श्रीकाडसिद्ध यांचेच नारायणरावमहाराज ( जे निंबरगीमहाराज या नांवानेंही प्रसिद्ध आहेत ) अनुगृहीत होत. त्यांचे एक विस्तृत चरित्र "सन्मार्गवैभव" या नांवाने चिमडचे राममाऊमहाराज असतांना त्यांच्या एका शिष्याने छापून प्रसिद्ध केले आहे. त्याप्रमाणें त्यांनी सहज केलेला हितोपदेश 'महाराजवर- वचन' या नांवानें बाबाचार्य काव्य, विजापूर यांनीं छापून प्रसिद्ध केला आहे. निवरगीमहाराजांनी स्वतः केलेलों कांहीं कानडी पदें त्या पुस्तकाच्या शेवटीं जोडली आहेत. निंबरगीमहाराजांचा जन्म लिगायत नीलवाणी जातींत शके १७१२ त झाला व त्यांचें निर्याण शके १८०७ चैत्र शुद्ध १२ स झालें. हे आपल्या पंचविसाव्या वर्षी सिद्धगिरीस गेले असतां (पं. स. १-२२ २३ ) त्यांस तेथें जंगम - रूपाने काडसिद्धांनी अनुग्रह दिला. पुढे घरी परत आल्यावर त्यांनीं ६ वर्षेपर्यंत साधनाची टंगळमंगळ चालविली. नंतर काडसिद्धांनों त्यांस पुनः दर्शन देऊन आपले अलौकिक सामर्थ्य दाखविलें व साधन करण्याविषयों पुनः आठवण दिली. नंतर नारायणरावांनी ३६ वर्षे