पान:नित्यनेमावली.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अविश्रांत साधन करून सिद्धगिरीस जाऊन सद्गुरूंची भेट घेतली व जगदुद्धाराची परवानगी मिळविली; व पुढे २८ वर्षे जगदुद्धाराचें काम करून त्यांनी निंबरगी येथें देह ठेविला. त्यांच्या समाधीवर देऊळ बांधण्याचं काम हल्ली निवरगी येथें चालले आहे.
 निवरगीमहाराजांचें अल्प चरित्र पंचसमासी समास १ यांत दिले आहे तें जिज्ञासूंनी पहावें. निंबरगीमहाराज हे एक अलौकिक पुरुष होऊन गेले. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे -
 "The greatest men in the world have passed away unknown. The Buddhas and the Christs that we know are but second-rate heroes, in comparison with the greatest men, of whom the world knows no- thing. Silently they live, and silently they pass away and in time their thoughts find expression in Buddhas and Christs, and it is these latter that become known to us."

- On Freedom


अशा महात्म्यांपैकी नारायणरावमहाराज हे होते. त्यांची दासबोधा- वर व तुकारामांच्या अभंगावर अत्यंत श्रद्धा होती. श्रीकाडसिद्धांच्या अनुग्रहानें व आपल्या साधनबलानें त्यांनी आत्मज्ञान पूर्ण अनुभविलें होतें, त्यांनी आपला मार्ग अत्यंत गुप्त ठेविला होता; त्यामुळे त्यांच्या कांहीं जिवलग मित्रांसही त्यांची योग्यता कळली