पान:नित्यनेमावली.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६५

प्रत्यक्ष भेटली आणि श्रीमंतानी याबाबतीत विचार करून कळवितो असे श्री परळेकराना सांगितले. त्याचवेळी श्री. गुरुदेव रानडे यांचा मुक्काम, सांगली येथे राजेसाहेबांच्या माळ बंगल्यावरच होता. श्री. परुळेकर यांची व श्री. गुरुदेवांची भेट झाली आणि श्री गुरुदेवांनी श्री परुळेकर यांचेवर अनुग्रह केला, त्यांना नाममंत्र दिला आणि नंतर श्री परुळेकरानी सांगली सोडली.

 पुढे महिनाभरांतच श्रीमंत राजेसाहेबांनी तारेने श्री. परुळेकर याना भेटीस बोलाविलें. कै. बाबुराव ठाकूर, श्री वसंतराव हेरवाड़कर वगैरे कॉलेजची चालकमंडळीही त्यांचेवरोबर सांगलीस गेली. तेथे राजेसाहेबांच्याबरोबर चर्चा होऊन जमींनीचे बाबतीचा वांधा नाहीसा करण्याचे श्री. परुळेकर यानी श्रीमंत राजेसाहेबांचेकडे मान्य केले. नंतर लगेच कॉलेजकरतां अजमासे चार एकर जमीन राजेसाहेबांनी देणगी म्हणून दिली. त्याच सर्व्हे नंबरपैकी