पान:नित्यनेमावली.pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६७

mankind and consequent peace and goodwill upon earth, bringing together intellectual and spiritual ...minded persons through (1) spiritual, symposiums ( 2 ) study and research, ( 3 ) Lectures, ( 4 ) Meeting and conferences and (5) Religious and philosophical publications.

 श्री. गुरूदेवांचें इतर कार्यामुळे आणि प्रकृतीही इतकीशी चांगली नसल्यामुळे त्यांचे हयातीत या संस्थेकडून कांहीं कार्य झाले नाहीं. तारीख ६-६-१९५७ रोजी श्री गुरुदेवांचे निर्माण झाले त्यांनंतर श्रीमंत राजेसाहेबांच्या सल्यानें बेळगांव येथील डिस्ट्रिक्ट जज्ज यांचेकडे नवीन, ट्रस्टी नेमण्याकरतां अर्ज करणेत आला आणि डिस्ट्रिक्ट जज्जानीं, १) श्री गणपतराव उर्फ काकासाहेब तुळपुळे, २) कृष्णराव उर्फ कृष्णराव उर्फ बाबासाहेव संगोराम, ३) श्री विठ्ठलराव जमखंडी, ४) श्री. जगन्नाथ राव परुळेकर व श्री के आर रानडें, या पांच जणांना ट्रस्टी म्हणून नेमले.